ताज्या बातम्या

शरयू कारखान्याची ठेकेदार व अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांची केली फसवणूक.

सांगलीचे ठेकेदार प्रसाद अण्णा, अहमदनगरचे ठेकेदार वसंत लोढा, इंडस्ट्रीमधील मुख्य अभियंता महादेव भंडारे, वरिष्ठ अभियंता संतोष खोले व संजय मुळे यांच्यावर लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे.

फलटण (बारामती झटका)

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयू इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंता यांनी मिळून कारखान्याची तब्बल 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये या पाच जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2021 पासून आजपर्यंत या घटना घडल्याचे पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी पोलिसांनी फॅब्रिक इंडस्ट्रीज व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांच्यावतीने काम करणारे वसंत लोढा या अहमदनगर मधील आणि प्रसाद अण्णा या सांगलीतील ठेकेदारांसह शरयू इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ अभियंता संतोष खोले, मुख्य अभियंता महादेव भंडारे, वरिष्ठ अभियंता संजय मुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फॅब्रिक इंडस्ट्रीज व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांच्यावतीने काम करणारे वसंत लोढा या अहमदनगर मधील आणि प्रसाद अण्णा या सांगलीतील ठेकेदारांनी वेगवेगळ्या सरकारी व निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्का असलेली कागदपत्रे सादर केली. व शरयू इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ अभियंता संतोष खोले, मुख्य अभियंता महादेव भंडारे, वरिष्ठ अभियंता संजय मुळे यांना हाताशी धरून पैशाचे अमिष दाखवले.

कोणतेही नवीन काम न करता जुन्या मशिनरी व साहित्यालाच नव्याने काम केल्याचे दाखवून कंपनीची एक कोटी 14 लाख 90 हजार 358 रुपयांची फसवणूक केली. त्यावरून वरील पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लोणंद पोलीस तपास करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort