ताज्या बातम्या

माळशिरस शहरातील बड्या व्यापाऱ्यावर जीएसटी अधिकाऱ्यांची धाड…

माळशिरस शहरासह तालुक्यातील जीएसटी चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर अधिकाऱ्यांची करडी नजर…

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत हद्दीतील बड्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर जीएसटी अधिकाऱ्यांची धाड पडलेली आहे. माळशिरस शहरासह तालुक्यातील जीएसटी चुकविणाऱ्या व बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर जीएसटी अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे.

शासनाने १८% जीएसटी सुरू केलेली आहे. खरेदीवर जीएसटी लावणे बंधनकारक केलेले आहे. व्यापाऱ्यांनी जीएसटी नंबर घेऊन बिलबुकावर छापलेले आहे. काही व्यापारी जीएसटी सहित बिल देत असतात तर, काही व्यापारी जीएसटी चुकवून व बुडवून व्यापारी खरेदी विक्रीचा व्यवहार करीत असतात. अशा वेळी शासनाचे पैसे कर रूपाने येत नाहीत. यासाठी जीएसटी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते.

माळशिरस शहरात बड्या व्यापारच्या दुकानांमध्ये अनेक खरेदी विक्री जीएसटी विना झाली आहे. त्यामुळे जीएसटी अधिकाऱ्यांची धाड पडलेली आहे. कितीतरी अधिकारी सदरच्या दुकानाची झाडाझडती घेत आहेत. अधिकारी अनेक दिवस माळशिरस शहरात तळ ठोकून आहेत. त्यामुळे माळशिरस शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांवर करडी नजर ठेवलेली आहे. जीएसटी चुकविणाऱ्या व बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांच्यामध्ये धडधड वाढलेली आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर सदरच्या व्यापाऱ्याची व दुकानाची सविस्तर माहिती जीएसटी अधिकाऱ्यांकडून घेऊन जनता व व्यापारी यांना प्रसारित करण्यात येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort