अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या जन्माष्टमी सोहळ्यानिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या जन्माष्टमी सोहळ्यानिमीत्त उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर पासुन अखंड हरीनाम सप्ताहानिमीत्ताने विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भैरवनाथ मूर्ती, व्यासपीठ, कलश, दीप, प्रतिमा, गाथा, ध्वज, टाळ, पेटी, पखवाज, विणा पूजनाने या सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे.
याच दिवशी सायंकाळी साडे सहा वाजता ह. भ. प. अशोक मोरे (ब्रह्मपुरी) महाराज यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता, ह. भ. प. ज्ञानेश्वर पवार महाराज (खेडभाळवणी) यांचे किर्तन, गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ह.भ.प. जालिंदर विठ्ठल येळवे महाराज (अंकोली) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. किरण बोधले महाराज (पंढरपूर) महाराज यांचे किर्तन, शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ह.भ.प. अरुण माळी महाराज (पापरी) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. योगेश बप्पा इंगळे महाराज (देवाचे दारफळ) यांचे कीर्तन, शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ह.भ.प. अतुल पवार महाराज (अंकोली) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. विशाल खोले महाराज (मुक्ताई नगर, जळगाव) यांचे किर्तन, रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ह.भ.प. भगवंत बाळकृष्ण पवार महाराज (अंकोली) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. सोनाली दिदी करपे महाराज (चकलंबा, बीड) यांचे किर्तन, सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ह.भ.प. पंकज उद्धव गुंड महाराज (डोणगाव) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. नितीन जगताप महाराज (हिप्परगा, ता. औसा) यांचे किर्तन, मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संतोष गाडेकर महाराज (भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) यांचे श्री भैरवनाथ जन्माचे किर्तन व दुपारी १२ वाजुन १२ मिनिटांनी भैरवनाथाचा जन्म यावेळी फुले टाकण्याचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद वाटप होणार असून दुपारी दोन वाजता ह.भ.प. गुलाब बराटे (अकोले ता.इंदापूर) महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाचा समारोप होणार आहे.

याशिवाय या सप्ताह काळात दररोज रात्री आकरा वाजता जागर व भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच या काळात दररोज दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केले जाणार आहे. तरी सर्व भाविकभक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



