ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मोहिते-पाटलांवर पूर्व भागात उमेदवारी नसल्याने तर पश्चिम भागात उमेदवारी लादल्याने मतदारांच्यात नाराजी…

“आली रे आली आता आमची बारी आली” – जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्जुनदादांचा करेक्ट कार्यक्रम करणार मतदारांचा सूर…

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी परिवारातील अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात उमेदवारी न दिल्याने व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात उमेदवारी लादलेली असल्याने मतदार व त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. याचे पडसाद मतदानावर उमटून “आली रे आली आता आमची बारी आली” असे म्हणत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्जुनदादांचा मतदार करेक्ट कार्यक्रम करतील, असा सूर मतदार व त्यांचे नातेवाईक यांच्यामधून येत आहे.

रणजितसिंहांचा अर्ज बाद, धैर्यशीलांनी अर्ज काढला!
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँकेचे माजी चेअरमन माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला, तर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज मंजूर झालेला असताना सुद्धा पुढील धोका ओळखून उमेदवारी अर्ज काढलेला आहे.

बँकेच्या संलग्न असलेल्या शेतकी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषक सेवा सोसायटी या मतदारसंघातून देशमुख शहाजीराव मुधोजीराव, पाटील ज्ञानराज संजय, मोहिते-पाटील अर्जुनसिंह मदनसिंह हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

पूर्व भाग नाराज का?
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते-पाटील यांच्याशी तीन पिढ्या निष्ठावान घराण्यातील सुभाषदादा दिनकरराव निंबाळकर व संग्रामसिंह जहागीरदार यांचे उमेदवारी अर्ज काढून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी मोहिते-पाटील गटाकडून कायम केलेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील मतदारांच्या मनामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुभाषदादा निंबाळकर यांनाच उमेदवारी मोहिते-पाटील यांनी द्यायला हवी होती, अशी धारणा होती. सुभाषदादा यांनी माळशिरस पंचायत समितीचे सभापती पद तसेच शंकरराव यमोहिते-पाटील सहकारी शेतकरी बँकेचे चेअरमन पद अशा अनेक पदावर काम केलेल्या व्यक्तिमत्त्वाला डावलेले असल्याने पूर्व भाग मोहिते-पाटील यांच्यावर नाराज आहे.

पश्चिम भागात उमेदवारी लादली?
तर माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित मांडवे या संस्थेचा अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते-पाटील यांचा ठराव करून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे वास्तव्य शंकरनगर ता. माळशिरस येथे आहे, असे असताना पश्चिम भागात निवडणुकीला उभे राहिलेले असल्याने पश्चिम भागातील अनेक मतदारांचा उभा राहण्याचा मनसुबा धुळीला मिळालेला असल्याने पश्चिम भागातील मतदार व नातेवाईक नाराज झालेले आहेत.

फोंडशिरस जिल्हा परिषद गटात अर्जुनसिंह उभे होते, दहिगाव पंचायत समिती गणात अर्जुनसिंह उभे होते. दहिगाव पंचायत समिती गणातील मतदारांनी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केलेला आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात उमेदवारी नसल्याने व पश्चिम भागात उमेदवारी लादल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत “आली रे आली आता आमची बारी आली” असे म्हणत अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा मतदार व नातेवाईक यांच्या मधून सूर येत आहे.

बाबाराजेंना सर्व समाजाची साथ!
सोलापूर जिल्हा बँकेचे भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख मराठा समाजाचे आहेत. त्यांची उमेदवारी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील व नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माळी समाजाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट भानुदास राऊत यांच्यासह अनेकांनी बाबाराजेंची उमेदवारी सुचवलेली आहे.

नातेपुते येथील देशमुख परिवार यांनी मोहिते-पाटील यांना माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात तीन पिढ्या साथ दिलेली आहे. मोहिते-पाटील यांच्या विचाराने राजकारण करीत असताना सुद्धा देशमुख परिवार यांनी समाजात व जनमानसात आपली प्रतिमा कधीही ढळू दिली नाही.

बाबाराजे देशमुख यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, प्रभारी चेअरमन पद, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, रेणुका परिवाराचे सर्वेसर्वा अशा अनेक पदावर काम केलेले आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अटीतटीच्या निवडणुकीत शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी राजकीय कौशल्यावर विजय खेचून आणलेला होता. सध्याच्या निवडणुकीत मामासाहेब पांढरे सुद्धा बाबाराजेंच्या सोबत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरस तालुक्यातील आजी माजी भाजपचे निष्ठावान पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी तिरंगी लढत असली तरी सुद्धा बाबाराजे देशमुख व अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे राजकीय वर्तुळासह मतदार व नातेवाईक यांच्या मधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button