अकलूज उपविभागीय कार्यालयाचा प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी पदभार स्वीकारला.
प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांचेकडून अकलूज उपविभागाचा पदभार काढून कुर्डूवाडीच्या प्रांताधिकारी यांच्याकडे दिला पदभार.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज उपविभागीय कार्यालयाचे प्रांताधिकारी म्हणून मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडून पदभार काढून कुर्डूवाडी उपविभागाच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. सध्या अकलूज उपविभागीय कार्यालयाच्या प्रभारी प्रांताधिकारी म्हणून ज्योती कदम यांनी पदभार स्वीकारलेला आहे.
अकलूज उपविभागाचे प्रांताधिकारी विजय देशमुख मेडिकल रजेवर गेल्यानंतर मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडे मार्च महिन्यापासून अकलूज उपविभागाचा पदभार होता. गेल्या पाच महिन्यामध्ये अप्पासाहेब समिंदर यांच्या कामकाजावर उपविभागातील जनतेची नाराजी होती. मुंबईपर्यंत लोकांनी आंदोलने व तक्रारी केलेल्या होत्या.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये भूसंपादन झालेल्या जमिनी व बाधित मोबदला मिळवण्याकरिता शेतकऱ्यांकडून ज्यादा टक्केवारी मागत आहेत, असा थेट आरोप करून त्यांच्या विरोधात वरिष्ठ व मंत्रालयात तक्रारी दाखल झालेल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस सरकार आल्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत.


प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडून पदभार काढून ज्योती कदम यांच्याकडे सध्या तरी पंधरा दिवसांकरिता पदभार दिलेला असल्याने अकलूज उपविभागांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
