अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळातील कोणाला संधी तर कोणाला डच्चू ?
कोणते संचालक सुपात घोळले जाणार तर, कोणते संचालक राजकीय जात्यात भरडले जाणार ?
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2017 ते 2022 या कालावधीतील विद्यमान संचालक मंडळातील कोणाला संधी तर कोणाला डच्चू मिळणार, याकडे विद्यमान संचालकासह मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या वेळच्या पंचवार्षिकमध्ये श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील शंकरनगर, श्री. बापूराव नारायण पांढरे नातेपुते, श्री. शहाजीराव मुधोजीराव देशमुख नातेपुते, श्री. पांडुरंग चांगोजीराव देशमुख अकलूज, श्री. किशोरसिंह मारुतराव माने पाटील अकलूज, श्री. शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील शंकरनगर, श्री. हरिदास लालासाहेब भोसले खंडाळी, श्री. आनंदराव आबासाहेब माने देशमुख वेळापूर, श्री. विष्णू शंकर केमकर माळशिरस, श्री. हनुमंत मुगुटराव दोलतडे खुडूस, श्री. इस्लाम लालखान पठाण पठाणवस्ती, श्री. रामदास शंकर माने कण्हेर, श्री. केशव बाळू कदम कदमवाडी, श्री. भीमराव गणपत गायकवाड जांभूड, श्री. चंद्रकांत विश्वनाथ मगर निमगाव, सौ. विजयमाला नानासाहेब माने देशमुख संगम, सौ. पुष्पलता दिलीप पाटील दहिगाव, श्री. गजानन भगवान एकतपुरे अकलूज माळेवाडी, श्री. बाहुबली चंद्रशेखर चंकेश्वरा नातेपुते, श्री. आनंद अशोक फडे अकलूज, श्री. जयराम तानाजी कर्चे पिंपरी, विशेष निमंत्रित संचालक श्री. राजकुमार विजयकुमार पाटील बोरगाव, श्री. सुधीर तानाजी काळे नातेपुते असे संचालक मंडळ होते.
मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे आहे. अनेकांना डच्चू बसण्याची शक्यता आहे. कोणाला सुपात घोळले जाणार तर कोणाला राजकीय जात्यात भरडले जाणार आहे, याचा फैसला दोनच दिवसात होणार आहे. निवडणुकीतील उमेदवार अंतिम संचालकाची यादी तयार आहे. यादीत असलेले खुश आहेत, फोनाफोनी सुरू आहे. मात्र, वगळलेले पर्यायी मार्ग शोधण्यामध्ये व्यस्त आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng