अब्दुल सत्तार यांचा माफी नामा नको राजीनामाच हवा – युवक अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील.
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा वक्तव्याचा जाहीर निषेध करून तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी असभ्य वर्तन करून महाराष्ट्रातील महिला भगिनींनी वक्तव्य करून अपमानित केलेले आहे अशा बेजबाबदार व वाचाळ मंत्र्याचा माफीनामा नको राजीनामाच हवा असे संतप्त विधान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये सत्तार यांचा निषेध करण्याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर गरळ ओकणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्याकरता माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक 9 11 20 22 रोजी अहिल्यादेवी चौकामध्ये निषेध कार्यक्रम आयोजित केलेला होता यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक चे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने बोलताना म्हणाले यावेळी माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य जयवंत तात्या पालवे, बबन बापू पालवे, राष्ट्रवादीचे नेते विकासदादा धाईंजे, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासो देशमुख, राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, सत्तार नदाफ रणजीत रघुनाथ धाईंजे तुषार महादेव पाटील नवनाथ रामचंद्र काळे उद्धव निंबाळकर वरून धाईंजे, दीपक नारायण सिद सुनील विष्णू गोरे रामचंद्र दत्तू गोरड सचिन शिवाजी माने भारत रघुनाथ गोरड राजेंद्र विठ्ठल मोठे कृष्णा हनुमंत ढोबळे हनुमंत बाळू गोरे अशोक तुकाराम शिंदे अजित शगन खुडे अभिजीत आप्पा केंगार अविनाश दत्तू कळसुले रामचंद्र पांडुरंग कचरे अमर बाबूलाल शेख सोमनाथ अण्णा पवार, खंडू बाबू कळसुले समशुलिन मुलांनी राजाभाऊ माने प्रताप माने, पोपट माने गणेश माने अशोक माने विश्वजीत माने आप्पा वाघमोडे सागर गायकवाड मारुती सोनटक्के सतीश मोटे मारुती पालवे मदन सुळे जितेंद्र गुरव जावेद तांबोळी कालिदास रुपनवर संतोष गोरड भाऊ गारोळे मच्छिंद्र गोरड सर पांडुरंग पिसे भाऊ बापू पांढरे कल्याण मल्हारी हुलगे राजू दादासो माने शुभम शिवाजी माने बापू आगतराव देवकते महेश धनाजी मोहिते आधी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकामध्ये कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणाबाजी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अहिल्यादेवी चौकापासून हलगीच्या निनादांमध्ये वाजत गाजत घोषणाबाजी करत भर उन्हामध्ये चालत तहसील कार्यालय माळशिरस येथे येऊन निवेदन तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशिष सानफ यांच्याकडे देण्यात आले माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळकर यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng