अमृता वागज यांचे “तुज मागतो मी आता” गीतास प्रेक्षकांची पसंती
टेंभूर्णी (बारामती झटका)
टेंभूर्णी ता. माढा येथील स्वरांजली म्युझिकल सिंगिंग प्रोग्राम यांच्यावतीने गणेशोत्सव काळात अमृता वागज यांनी सुमधुर आवाजात गायलेले गणपती बाप्पा वरील “तुज मागतो मी आता” हे भक्तीगीत प्रसिद्ध करण्यात आले होते. हे गीत रसिक प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले असून आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून या भक्तीगीताची चर्चा टेंभूर्णी परिसरात होत आहे.
गौरी-गणपती सणानिमित्त गायिका अमृता सुधीर वागज यांनी यूट्यूब चॅनलवर गायलेल्या “तुज मागतो मी आता” या भक्ती गीताला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गीताला यूट्यूब चॅनलवर पंधरा दिवसात हजारो व्हीव्हर्स मिळालेले आहेत.
त्या सध्या जनाई संगीत क्लासेसचे शिक्षक गुरुवर्य सोपान मोरे सर यांच्याकडे पुढील शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. यासाठी त्यांना सासुबाई सुनिता व सासरे लक्ष्मण वागज, आई सुरेखा व वडील आण्णासाहेब ताकभाते हे दोघे तसेच पती सुधीर वागज व जाऊ व दिर ऐश्र्वर्या व रोहित वागज हे प्रोत्साहन देत आहेत. हे सर्व प्रोत्साहन देत असल्यामुळे मला गायनाची संधी मिळाली असल्याचे नवोदित गायिका अमृता वागज यांनी सांगितले. तर यापुढेही अनेक हिंदी- मराठी भक्तिगीते व चित्रपट गीते गाऊन प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
तर स्वरांजली म्युझिकल सिंगिंग प्रोग्राम यांचे वतीने युट्युब चॅनेलवर व कार्यक्रमात सादरीकरण करणार असल्याचे पती सुधीर वागज यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng