जेष्ठ पत्रकार राजा माने यांच्या पाठपुराव्याला यश; डिजिटल मीडियाला मिळाली राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार
मुंबई (बारामती झटका)
राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक मंगळवार दि. ३ जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार, महाबळेश्वर व कनेरी मठ, कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशना दरम्यान सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीसुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.
राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला शासकीय राजमान्यता व जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.