पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जनता दरबारात माळशिरस तालुक्यातील गद्दाराच्या लागल्या रांगा….पण जयाभाऊ म्हणतात रामभाऊला भेटा.

माळशिरस विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची पूर्णत्वाकडे वाटचाल…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियान पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या तालुक्यातील गद्दारांच्या पालकमंत्री यांच्या जनता दरबारात रांगा लागत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचे लोकसभेला अपेक्षेपेक्षा जास्त खासदार निवडून आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत खोबरं तिकडं चांगभलं, अशी कार्यकर्त्यांची टोळी मतदारसंघात कार्यरत होती. महायुतीमध्ये असणारे गद्दार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम हस्ते परहस्ते फोनवरून केलेले आहे. माळशिरस तालुक्यातील निष्ठावान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना एक लाख आठ हजाराच्यावर मताधिक्य दिलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव झाला असला तरीसुद्धा सर्वसामान्य व गोरगरीब जनता कायम राम सातपुते यांच्या सोबत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी साथ सोडलेली नाही मात्र, विधानसभेला विरोधात काम करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जनता दरबारामध्ये जाऊन स्वतःची व सार्वजनिक कामे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शिफारशीने तालुक्यातील व्यक्तिगत व विकासकामे करावी, अशी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांनी माळशिरस तालुक्यातील नेते व कार्यकर्ते कामे घेऊन येतील त्यावेळेस पालकमंत्री यांची शिफारस असेल तरच कामाचा विचार करावा अन्यथा, केराची टोपली दाखवून गद्दारांना त्यांची जागा दाखवावी, अशी निष्ठावान कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.