सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
अकलूज ( बारामती झटका )
दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी गांधी चौक, अकलूज येथे अनिल कदम व सहकारी संकेत कदम, शशांक जाधव पाटील, आप्पासो कदम यांच्या सेंद्रिय खोमणे गुळाचा चहा या अमृततुल्याचा उद्घाटन समारंभ युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सोलापूर जिल्हा) यांच्या शुभहस्ते आणि सतीश नाना पालकर (चेअरमन शंकराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज), वसंतराव गायकवाड (डे.सरपंच आनंदनगर, अकलूज), आबासाहेब वाघमारे पाटील (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा), डॉ. बाळकृष्ण गायकवाड (मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई), अमरभैया जगदाळे (सामाजिक कार्यकर्ते, सराटी) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बोलताना सांगितले कि, रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढीसाठी गुळाच्या चहाची गरज आहे. गूळ हा लोखंडाच्या कढईत बनवत असल्यामुळे लोखंडाच्या कढईतील आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम इ. घटक गुळामध्ये उतरतात व हे सर्व घटक शरीरास आवश्यक असतात, त्यामुळे सर्वांनी गुळाचा चहा घ्यावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सोनवणे र णजीत जाधव, सतीश कुंभार, मयूर माने, संतोष क्षीरसागर, राजेश ललवाणी, ऋषीकेश गायकवाड, संजय जगदाळे, संजय शिंदे, पोपट पाटील, डॉ. नितीन कुबेर, डॉ. प्रवीण पताळे, रो. नितीन दोशी, रो. विठ्ठल गायकवाड, लखन कस्पटे, बापू चव्हाण सर, वसंत शेंडगे सर, इंजिनियर शेंडगे, नवनाथ सावंत (अध्यक्ष मराठा व्यावसायिक संघटना, अकलूज ), उमेश जगदाळे, अक्षयभाई फडे, रामभाऊ सुरवसे, राहून खोमणे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng