संग्रामनगरचे माजी उपसरपंच युवा नेते श्रीराज माने पाटील, यश उद्योग समूहाचे युवा उद्योजक दीपकभाऊ जाधव, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष टेंभुर्णीचे माजी सरपंच सुधीरबापू महाडिक पाटील या त्रिमूर्तींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन.
वेळापूर ( बारामती झटका )
अखंड भागवत धर्माचे श्रद्धास्थान भारताची दक्षिण काशी समजली जाणारे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आणि भागवत धर्माचा ज्यांनी पाया रचला असे ज्ञानेश्वर माऊली व ज्यांनी कळस चढविला असे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या दर्शनाकरिता देहू-आळंदी-पंढरपूर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना व पर्यावरणाचा समतोल राखणारा वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवून पायी चालत जाणार्या भाविकांना विसावा घेण्याकरता वृक्षारोपणाचा भविष्यात फायदा होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे मौलिक विचार माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती जलनायक अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी संग्रामनगरचे माजी उपसरपंच युवा नेते श्रीराज माने पाटील, यश उद्योग समूहाचे युवा उद्योजक दीपकभाऊ जाधव, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष टेंभुर्णीचे माजी सरपंच सुधीरबापू महाडिक पाटील या त्रिमूर्तींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.


यावेळी माजी उपसभापती जलनायक अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्रीमूर्तींचा सन्मान व वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित वेळापूर, मदनसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित भाकरेवाडी, पिसेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित पिसेवाडी या तिन्ही सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सन्मान कार्यक्रम युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे यांच्या फार्म हाऊसवर संपन्न झाला.
कार्यक्रम स्थळी आगमन होताच शंभर फटाक्यांच्या तोफांची सलामी देण्यात आली, हलगीच्या निनादात वाजत-गाजत भव्य मंडपामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांना आणले होते. संग्रामनगरचे माजी उपसरपंच युवा नेते श्रीराज माने पाटील, इंदापूर येथील यश उद्योग समूहाचे युवा उद्योजक दीपकभाऊ जाधव, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष टेंभुर्णीचे माजी सरपंच सुधीरबापू महाडिक पाटील या त्रिमूर्तींचा सन्मान प्रमुख पाहुणे अर्जूनसिंह मोहिते पाटील व संयोजक उमेशशेठ भाकरे यांनी करून एकाच हारात गुंफुन केक कापून वाढदिवसानिमित्त भावी कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन अमरसिंह माने देशमुख, व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, मदनसिंह विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव भाऊ चव्हाण, व्हाईस चेअरमन ओंकार माने देशमुख, पिसेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक आनंता पिसे, व्हाईस चेअरमन प्रकाश महादेव गायकवाड यांच्यासह तिन्ही सेवा संस्थेच्या नूतन संचालकांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, वेळापूरचे माजी सरपंच माणिकराव चव्हाण, पिसेवाडीचे माजी सरपंच प्रगतशील बागातदार सुरेशराव पिसे, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष युवा नेते अमृत भैय्या माने देशमुख, आनंदमूर्ती पतसंस्थेचे चेअरमन उत्तमराव काशीद, वेळापूरचे माजी उपसरपंच शंकरराव काकुळे, युवा नेते धनूभैया माने देशमुख, गोरमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाळराव देशमुख, वेळापूरचे माजी उपसरपंच चंद्रकांत बनकर, ग्रामपंचायत सदस्य दिपकआबा राऊत, पिसेवाडीचे उपसरपंच मोहन भाकरे, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, युवा नेते राहुलभैया कोडग, ॲड. कोरबू, राहुल चौगुले, आप्पासो देशमुख, शिवाजी चौगुले, प्रतापराव मगर, अण्णासाहेब मगर, अंबूकाका माने देशमुख, श्रीधर देशपांडे, बाळासो आडत, अशोक साबळे, अश्फाक मुलाणी, सतीश नवले, भारत इंगळे, उद्योजक उमेश बनकर आदी मान्यवरांसह वेळापूर, पिसेवाडी, भाकरेवाडी येथील ग्रामस्थ व उमेश शेठ भाकरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान प्रमुख अतिथी व संयोजक यांच्यावतीने करण्यात आला. मनपसंत भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे सर यांनी केलेले होते.नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

