आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची निमगावकरांना दिवाळी भेट
निमगांव पाणी पुरवठा योजनेकरिता 33 कोटी रूपयांच्या तांत्रिक आराखड्यास मंजूरी
अकलूज (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत निमगांवगाव व वाड्या-वस्त्यांकरीता 33 कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजूरी मिळाली असून लवकरच प्रशासनाकडून ही योजना कार्यान्वित होऊन निमगावकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सन २०५४ पर्यंत म्हणजेच पुढील तीस वर्षांचा विचार करून निमगांवसाठी पाणी पुरवठा योजना होणार आहे. यामध्ये वेळापूर डीफोरच्या स्टार्टिंग पॉईंट येथून पाणी उचलले जाणार असून बोडरे वस्ती येथे बांधल्या जाणाऱ्या RCC पाणी साठवण तलावात येणार आहे.

तसेच बोडरे वस्ती येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राव्हीटेशनल फोर्सवेने पाणी पुरवठ्याकरीता उंच टाकी बांधली जाणार आहे व तेथून निमगाव व वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपसमितीच्या बैठकीत निमगांव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजूरी मिळाल्याने पुढील तीस वर्षांचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटला जाणार आहे. आ. रणजितसिंह यांच्यातर्फे निमगांव परिसरातील वाड्या वस्त्यांमधील नागरिकांना दिवाळीच्या मुहुर्तावर अनोखी दिवाळभेटच म्हणावी लागेल. निमगांव व परिसरातील वस्त्यांमधील प्रत्येकांच्या घराघरात नळ कनेक्शनद्वारे पिण्याचे पाणी येणार असल्याने नागरिकांकडून आ. मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
निमगांव व वाड्यावस्त्यांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या टाक्या
१) निमगांव – १ लाख ८४ हजार लिटर
२) केशव नगर – १ लाख ४० हजार लिटर
३) माळसाई मळा – १ लाख १० हजार लिटर
४) थोरात वस्ती २८, हजार लिटर.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng