उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नॅनो डीएपी उपलब्ध
इफको कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा पुढाकार
उत्पादन खर्च कमी करा – रवींद्र मोरे
करमाळा (बारामती झटका)
रासायनिक खताच्या भरमसाठ वापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांचाही उत्पादन खर्च वाढतो यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकाराने इफको कंपनीने नॅनो डीएपी बाजारात आणला असून याचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाच्या उत्पन्नाचा खर्च कमी करावा त्याचबरोबर भरमसाठ खताचा वापरामुळे होणारे दुष्परिणामावर आळा घालण्यासाठी नॅनो डीएपी चा वापर करावा
असे आव्हान इफको कंपनीचे फिल्ड ऑफिसर रवींद्र मोरे यांनी केले आहे
डीएपी खताच्या पोत्याची किंमत 1350 रुपये असून ही डीएपी खताची लिक्विड वाटली 600 रुपयाला आहे यामुळे शेतकऱ्याचा प्रति बॅग सातशे पन्नास रुपये खर्च वाचणार आहे
हे खत फवारणी द्वारे देण्यात येत असल्यामुळे जमिनीवर दुष्परिणाम होणार नाही
शिवाय भरमसाठ खताचे वापरामुळे होणारे रोगराई कॅन्सरचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे
येत्या वर्षभरात संपूर्ण देशात तीस लाख नॅनो डीएपी बाटल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे
या नॅनो गृहमंत्री अमित शहा यांचे हस्ते विक्री शुभारंभ झाला आहे
सोलापूर जिल्ह्यात सुद्धा प्रचंड प्रमाणावर डीएपी चा वापर होतो आता ह्याला न्यानो डीएपी हा एक पर्याय असून याला रासायनिक खतमंत्रालय नवी दिल्ली याची मान्यता आहे
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक अधिकृत रासायनिक खत विक्री दुकानातून हा नॅनो डीएपी शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे
बाळासाहेब शिंदे
जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर
नॅनो डीएपी हा नवीन अविष्कार असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च सुद्धा बचत होणार आहे रासायनिक खताचे वापरामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतीची उत्पादन क्षमता कमी होत आहे शिवाय या भरमसाठ वापरामुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला मानव जातीला धोका निर्माण होत आहे
नॅनो डीएपी फवारणी द्वारे शेतकऱ्यांनी वापरावा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng