कचरेवाडी येथे शेतकरी मेळावा संपन्न…
कचरेवाडी (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय व गंगा कावेरी सिड्स प्रा. लि. हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कचरेवाडी ता. माळशिरस येथे दि. ११ ऑक्टोबर रोजी ८६ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व गावचे सरपंच श्री. पांडूरंग कचरे, प्रगतशिल शेतकरी श्री. अतिश तरडे, श्री. रमेश फाळके विभागीय विक्री प्रमुख, श्री. सदीप सावंत, श्री. सानदेव कोळेकर गंगा कावेरी सिड्स कंपनी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी मका लष्करी अळी नियंत्रण, जैविक बीज प्रक्रिया व उत्पादन वाढ, पीएम किसान ई-केवायसी, रब्बी हंगाम प्रमुख पिके पिक स्पर्धा, किसान क्रेडीट कार्ड याबाबत माहीती व मार्गदर्शन केले. श्री. सागर टकले मंडळ कृषि अधिकारी माळशिरस यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, वाव, संधी व अनुदान याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
कचरेवाडी गावचे कृषीसहाय्यक श्री. राजू हुलगे यांनी फळबाग लागवड व योजना अनेक अर्ज एक महाडीबीटी बाबत माहीती दिली. श्री. रमेश फाळके यांनी मका लागवड विक्रमी उत्पादन तंत्रज्ञान व गंगा कावेरी मका G K – 3057 या संकरीत जातीची उत्पादन क्षमता व चारा प्रत बाबत महिती दिली.
या कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन श्री. संदीप सावंत, श्री. सानदेव कोळेकर व कंपनी अधिकृत विक्रेते यांनी केले होते.
सदर कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवर व शेतकरी यांचा सत्कार, आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng