कळंबोली गावातील प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थी वैभव पवार यांचा सायस्टिंस्ट बनण्याचा संकल्प पूर्ण होणार
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने पवार परिवार यांना मिळाला आशेचा किरण
कळंबोली ( बारामती झटका )
कळंबोली ता. माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी व गरीब परिस्थितीतील हुशार विद्यार्थी वैभव विलास पवार यांच्या आर्थिक अडचणींमुळे लहानपणापासून उराशी बाळगलेले सायंस्टीस्ट होण्याचे स्वप्न अपुरे राहते की काय, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अशा अडचणीच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने पवार परिवार यांना आशेचा किरण मिळाला असल्याने प्रतिकूल परिस्थितीतील हुशार विद्यार्थी वैभव पवार याचं सायस्टिंस्ट बनण्याचा संकल्प पूर्ण होणारच. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंतची आर्थिक अडचण दूर झाली आहे.
कळंबोली येथे विलास दादासाहेब पवार व सौ. नंदाताई विलास पवार यांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्यांचा 2001 साली विवाह झाला आहे. नंदाताई यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील आहे. त्यांचे शिक्षण 12 वी झालेले आहे. विलास पवार यांचेही 12 वी शिक्षण झालेले आहे. प्रतिकुल परिस्थितीत आपल्या संसाराला सुरुवात केलेली होती. अर्धा एकर जमीन असल्याने नंदाताई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतात. विलास यांनी शेती करीत किराणा दुकान सुरू केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत संसार बाळसं धरु लागला होता. दि. 23/05/2003 साली मुलगा वैभव याचा जन्म झालेला होता. एक मुलगी जन्मतः मृत झाली होती. त्यामुळे नंदाताई यांना धक्का बसला होता. त्या नेहमी तणावात असत. त्यामुळे चक्कर येणे व इतर गोष्टींना सामोरे जावे लागत होते. अशा कठीण परिस्थितीत वैभव याच्या लहानपणीच्या हुशारीमुळे पहिलीला वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी ( BCA) येथे शाळेत प्रवेश घेतला. चौथीपर्यंत वडील विलास पवार सायकलवर ने-आण करीत होते. पाचवीत प्रवेश केल्यानंतर स्वतः वैभव सायकलवरून शाळेत जाऊ-येऊ लागला. दररोज सायकल प्रवास 7 ते 8 किलोमीटर अंतर होत होता. तरी देखील दहावीच्या बोर्ड परिक्षेत 91% मार्कस पाडुन उत्तीर्ण झालेला होता.
अकरावीसाठी बारामती येथील चैतन्य ॲकॅडमी येथे प्रवेश घेतला. त्याठिकाणी तीन लाख रुपये खर्च होता. मात्र, ॲकॅडमीचे सर्वेसर्वा वैभव फडतरे यांनी एक रुपया न फी घेता दोन वर्षे शिक्षण पूर्ण केले. सीईटी परिक्षेच्यावेळी 5 ते 6 लाख विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते. त्यामध्ये वैभव पास होऊन तामिळनाडू येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नंबर लागला होता. पहिल्या वर्षीची फी चार लाख रुपये भरावयाची होती. त्यावेळी अर्धा एकर जमीन गहाण ठेवून दोन लाख रुपये आणि दुकानाच्या पिग्मीवर छत्रपती बिगर शेती ग्रामीण पतसंस्था वालचंदनगर येथील दोन लाख रुपये कर्ज काढले होते.
वैभवला गरीबीची जाण होती, आईवडील यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन उज्ज्वल भविष्यासाठी मनात जिद्द, चिकाटी आणि ध्येय गाठण्यासाठी मन लावून अभ्यास केला. नऊ हजार विद्यार्थीची बॅचमध्ये वैभव पवार 97% मार्कस मिळवून उत्तीर्ण झालेला होता. मुलाची शैक्षणिक प्रगती झालेली होती. मात्र आईवडील यांचा यावर्षीच्या चार लाख फीसाठी आटापिटा सुरू होता. बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज दाखल करून कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र बँकेकडून चालढकल सुरू होती. विनवणी केली, अडचण सांगितली होती, तरीही बँकेत शैक्षणिक कर्जाचा मेळ बसत नव्हता.
वैभवच्या शाळेकडून 15 जून ते 30 जून दरम्यान फी भरण्याचा तगादा लावला होता. विलास पवार यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. अर्धा एकर जमीन पाठीमागच्या वर्षी गहाण खत केलेली होती. जवळ तर पैसा नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांवर शाळेचे पैसे भरण्याची मुदत संपणार होती. अशावेळी कळंबोली गावातीलच मुंबई येथे असणारे दीपक पावणे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर संपूर्ण परिस्थिती सांगितली. दीपक पावणे यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना फोन केला. त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी घडत होत्या. आमदार राम सातपुते मुंबई येथे तळ ठोकून होते. त्यांच्याकडे विशिष्ट जबाबदारी होती अशा घाईगडबडीत सुद्धा शैक्षणिक विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्याने त्यांनी संपूर्ण माहिती व्हाट्सअप वर एसएमएसद्वारे घेऊन सदरची माहिती पंतप्रधान कार्यालय व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवून स्वतः जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.
शैक्षणीक कर्जाची सुत्रे एवढी वेगाने हालली, दोन तासात विलास पवार यांना बँकेतून फोन आला आपले प्रकरण मंजूर आहे अडीच लाखाचा चेक घेऊन जावा. पवार परिवार यांचा जीव थोडासा भांड्यात पडला, आधार आला. अडीच लाख रुपये शैक्षणिक कर्ज मिळाले. उर्वरीत दीड लाख रुपयाची जुळवाजुळव सुरू झाली. पन्नास हजार रुपये पाहूण्यांकडून तर एक लाख रुपये व्याजाने घेऊन चार लाख रुपये जमवाजमव करून वैभवाची फि भरण्यात आलेली आहे. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीमुळे पवार परिवार यांच्या घरात आनंदाला पारावार उरला नव्हता. कारण संपूर्ण मावळलेल्या आशा होत्या, त्याला अंकुर फोडण्याचे काम आमदारांचा एका फोनमुळे झाले. वैभवच्या शिक्षणाचा प्रश्न हलका झालेला असल्यामुळे पवार परिवार आमदारांच्या दमदार कामगिरीवर समाधानी आहेत.
दिपक पावणे यांनी पवार दांपत्य यांच्या आर्थिक सर्व वाटा बंद पडलेल्या होत्या. अशा अडचणीच्या काळात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. आमदार यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून गरीब व हुशार विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी राजकीय घाईगडबडीत असताना सुद्धा मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्परता दाखवली आहे.
दिपक पावणे यांनी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संपर्क साधला. वैभव पवारसारख्या गरीब परिस्थितीतील आर्थिक अडचणींवर मात करून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेळ काढून आवर्जून भेट द्यावी. समाजाला लोकप्रतिनिधी कसा असावा याचे अनुकरण लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्यातून वैभव पवार याचे उज्ज्वल भविष्यासाठी समाजात चित्र मांडावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी पवार दांपत्य वैभव पवार यांची कळंबोली येथे निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
साधं राहण्याचे घर आहे, घरासमोर छोट्याशा जागेत किराणा मालाचे दुकान आहे. वेभवचे आईवडील कष्टाळू आणि जीद्दी व स्वाभिमानी आहेत. परिस्थीती गरीबीची आहे, मात्र मनात मुलाला शिक्षणासाठी कितीही हाल झाले तरी चालेल पण मुलाचे सायस्टीस्ट होण्याचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
वैभव पवार याची सुद्धा जिद्द आहे. आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करायचे आणि कायम गरीबीची जाण ठेवायची. इन्स्टिट्यूट मध्ये 97 रॅंक मिळाल्यानंतर मित्रांनी पार्टी मागितली. त्यावेळेस पैसे नसल्यामुळे देऊ शकलो नाही, असे सांगून इन्स्टिट्यूटमध्ये 500 नंबर पर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना एयर कंडीशन होस्टेल दिले जाते. त्याची फी दीड लाख रुपये आहे. माझा एक मित्र आहे त्याचे वडील दीड लाख फी भरतो म्हणाले परंतु मी त्यांना नको म्हणून सांगितले. कारण आपल्या घरामध्ये आई-वडिलांना घरात पंखा सुद्धा नाही आणि आपण एअर कंडिशन रूममध्ये राहणे बरोबर नाही. त्यामुळे दुसऱ्याने फी भरून सुद्धा एअर कंडिशन मध्ये न राहता साध्या रूममध्ये राहत आहे, असे सांगत असताना त्याच्या डोळ्यांमध्ये भविष्यातील यश दिसत होते.
विलास पवार यांना बँकेने तीन वर्षाकरिता चार लाख रुपये फी आहे. म्हणून बारा लाख मंजूर करणे गरजेचे होते. मात्र साडेसात लाख मंजूर केलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी दीड लाख रुपयाची जुळवा जुळव करणे, वैभवच्या आई-वडिलांची तारेवरची कसरत होणार आहे. वैभवच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी होतकरू व गरीब विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी वैभव याचे नातेपुते येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अकाउंट नंबर 40937145977 व फोन पे 7058262342 असा आहे. वडील विलास दादासाहेब पवार यांचा फोन पे व गुगल पे नंबर 9665040325 असा आहे. जे कोणी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात त्यांनी सढळ हाताने मदत करावी. त्यांच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर मदतीचे आवाहन बारामती झटका परिवार यांचेकडून केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I found this article both informative and enjoyable. It sparked a lot of ideas. Lets chat more about it. Click on my nickname!