चि. सौ. कां. सोनाली देशमुख, भांबुर्डी व चि. विजय पिंगळे, तरंगफळ यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न
प्रेषक भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आ. राम सातपुते आणि भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्यावतीने लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
भांबुर्डी (बारामती झटका)
कै. कांता सुब्राव देशमुख यांची नात व श्री. राजेंद्र कांता देशमुख, रा. भांबुर्डी, ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. सोनाली आणि पंडा रामा पिंगळे यांचे नातू व श्री. बाजीराव पंडा पिंगळे, रा. तरंगफळ, ता. माळशिरस यांचे चिरंजीव विजय यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दि. २२/०५/२०२३ रोजी दुपारी १ वा. ३१ मि. या शुभमुहूर्तावर संत सावतामाळी मंगल कार्यालय, एसटी स्टँड जवळ, पुणे-पंढरपूर रोड, माळशिरस, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभमंगल सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन प्रेषक भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते आणि भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस व माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांता देशमुख यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन देशमुख व पिंगळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng