Uncategorizedताज्या बातम्या

डॉ. देविदास कपने यांचे दुःखद निधन

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व यशोदीप शिक्षण, क्रीडा, ग्रामोद्योग व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. देविदास सिताराम कपने यांचे वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये शिंदेवाडी, पिलीव, सदाशिवनगर, फोंडशिरस, निमगाव या ठिकाणी पंचायत समिती माळशिरसच्या व अचकदाणी येथे पंचायत समिती सांगोल्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय विभागामध्ये सेवा केली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते कै. हरिभाऊ सिताराम कपने (पंचायत समिती सदस्य) यांचे लहान बंधू होते.

त्यांच्या पैशात दोन मुली, एक मुलगा, पत्नी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्व आप्तस्वकीय, पाहुणे, मित्रमंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले व कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांच्यावर राहत्या निवासस्थानी बुधवार दि. २८.०६.२०२३ रोजी उत्तरकार्य (तेरावा) होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button