सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने मोफत झेंडे वाटप
वेळापूर (बारामती झटका)
हर घर तिरंगा अभियान निमित्त रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेकडून वेळापुर, पिसेवाडीमधील रेशनकार्ड धाराकांना १५१ मोफत झेंडे वाटप तलाठी आफिस वेळापुर याठिकाणी करण्यात आले.
दुकानदार संघटनेकडुन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
यावेळी वेळापुर पिसेवाडीचे तलाठी श्री. तोरके भाऊसाहेब, रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. विजय मंडलिक, संजय खराडे, सुरज साखरे, रणजितसिंह भगत, नवनाथ कदम, सुमित साखरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनंत जवंजाळ, दादा भाकरे, नवनाथ पवार, अंबादास शेडगे, धनंजय शिवपुजे, मनोज उरणे, अमित उरणे, कुलकर्णी, राजु उरणे, लाला शिंदे, अमोल टिंगरे, किशोर भाकरे, अवधूत वाघमारे, प्रशांत जवंजाळ आदींसह बहुसंख्य रेशनकार्ड धारक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
