तरंगफळच्या शेतकऱ्याची कन्या कुमारी प्रियंका तरंगे हिची महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष श्री बाबासाहेब माने पाटील यांनी प्रियांका तरंगे हिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथील शेतकरी श्री. नामदेव तरंगे यांची कन्या प्रियांका तरंगे हिने महाराष्ट्र पोलीस पदांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करून पोलीस प्रशासनात पोलीस पदी नियुक्ती झालेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन मुलीने यश संपादन केलेले असल्याने प्रियांका तरंगे हिच्यावर अनेक स्तरातून सत्कार व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तरंगफळ गावची कन्या प्रियंका नामदेव तरंगे यांची महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. बाबासाहेब माने-पाटील यांनी सन्मान केला. यावेळी आण्णा काळे, दादा काळे, श्री. नामदेव तरंगे, रावसाहेब तरंगे, हर्षवर्धन तरंगे, विकास लोंखडे, अभंराव तरंगे, पै. कालिदास रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng