Uncategorizedताज्या बातम्या

तळागाळातल्या लोकांची रत्नत्रय पतसंस्था : नितीन दोशी

सदाशिवनगर (बारामती झटका)

रत्नत्रय पतसंस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. ही पतसंस्था, सामाजिक बांधिलकी जपत विविध कामे सदाशिवनगर व पंचक्रोशीत करत असल्यामुळे ही पतसंस्था आदर्श पतसंस्था ठरली आहे व तळागाळातील गोरगरिबांना व्यवसायासाठी कर्ज देऊन ही पतसंस्था त्यांचा आधारवड ठरली आहे, असे प्रतिपादन म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्था म्हसवडचे चेअरमन श्री. नितीन दोशी यांनी केले. सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्यालयात श्री. नितीन दोशी यांच्या शुभहस्ते रत्नत्रय दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेस त्यांनी रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच मा. श्री. विरकुमार दोशी, व्हा. चेअरमन श्री. संजय गांधी, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे चेअरमन श्री. प्रमोद दोशी, पुरंदावडे गावचे माजी सरपंच देवदास ढोपे, हरी पालवे, येळीवचे उपसंरपच शिवराज निंबाळकर, रत्नत्रय पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, जगदीश राजमाने, रामदास गोफणे, सतीश गांधी, अजय गांधी, सोमनाथ राऊत, सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्यालयात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला.

पुढे बोलताना प्रमोद दोशी म्हणाले की, संस्था ऑनलाईन व्यवहार करत आहे. संस्थेमार्फत सभासदांना डीडी काढणे, आरटीजीएस एनएफटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, लाईट बिल भरणे, क्यूआर कोड मार्फत पैसे पाठवून संस्थेतून रोख मिळतील अश्या विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संस्थेची स्थापना परिसरातील छोटे व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे, त्यांची उन्नती व्हावी, या उद्देशाने करण्यात आली असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद ठेवेदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे. आर्थिक व्यवहाराबरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्य हि करत आहे. गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी दिनदर्शिका काढत असते. तसेच सर्व जाहिरातदारांच्या सहकार्याने दिनदर्शिका निघत आहे, असेच प्रेम संस्थेवर रहावे, त्याबद्दल सर्व जाहिरातदारांचे आभार प्रमोद दोशी यांनी मानले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर श्री. नितीन दोशी हे माणदेश औद्योगिक वसाहत संचालक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार रत्नत्रय परिवाराचे संस्थापक श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. त्यानंतर मा.श्री.विरकुमार दोशी हे सदाशिवनगर गावच्या सरपंच पदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल श्री. नितीन दोशी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

दि. 31/12/2022 अखेर संस्थेकडे 19 कोटी 41 लाख 11 हजार 136 रुपये इतक्या ठेवी असून कर्जवाटप 16 कोटी 87 लाख 88 हजार 759 रुपये इतके केले आहे. संस्थेचे भाग भांडवल 42 लाख 90 हजार 900 रुपये असून गुंतवणूक 6 कोटी 32 लाख 6 हजार 017 इतकी आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 109 कोटी 42 लाख 03 हजार 238 रुपये आहे. सर्व खर्च वजा जात संस्थेला 22 लाख 21 हजार 316 रुपये इतका नफा दि. 31 मार्च 2022 अखेर झालेला आहे. संस्थेचा व्याजदर पुढीलप्रमाणे – कॉलडिपॉझिट 4%, तीन महिन्याचे सहा महिने 5% टक्के, सात महिने ते बारा महिने 6%, तेरा महिने ते 23 महिने 7%, चोवीस महिने व पुढे 8%, दाम दुप्पट ठेवून 7 वर्षे 9 महिने (93 महिने) सर्व कर्जास व्याजदर 15%. संस्था स्थापनेपासून दरवर्षी सभासदांना 15% लाभांश वाटप करीत आहे. संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग “अ” मिळत आहे आणि हे सर्व संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे शक्य झाले, अशी माहिती सचिव ज्ञानेश राऊत साहेब यांनी दिली. त्या नंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन मा. श्री. विरकुमार दोशी यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button