ताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अकलूज एस.टी. आगार प्रमुख यांना दिले निवेदन

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक

अकलूज (बारामती झटका)


ग्रामीण भागातील वरदायिणी असलेली राज्य परिवहन महामंडळ बस सेवा मानली जाते. सध्या अकलूज या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सायंकाळी शैक्षणिक वेळ संपल्यानंतर ५.०० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी लवकर जाण्यासाठी अकलूज ते दसुर आणि अकलूज ते सांगोला या प्रवास मार्गातील एस.टी.बसची अतिरिक्त फेरी वाढवावी आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज समोर बस थांबा चा फलक लावून विद्यार्थ्यांची थांबण्याची त्याठिकाणी सोय व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन अकलूज आगार प्रमुख यांचेवतीने श्री. दळवी साहेबांनी निवेदन स्वीकारले आहे.


सदर निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी अकलूज, सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज तसेच अभ्यासक्रम निगडित व संगणकीय प्रशिक्षण तासिका यांचा ठीक ५.०० वाजण्याच्या सुमारास शैक्षणिक वेळ संपण्याचा कालावधी आहे. या काळात माळशिरस तालुक्यातील अकलूज ते सांगोला या भागातील खंडाळी, वेळापूर, साळमुख, मळोली, फळवणी, कोळेगाव आणि अकलूज ते दसुर या प्रवास मार्गातील खंडाळी, वेळापूर, उघडेवाडी, तोंडले, बोंडले, दसुर या गावातील वयोवृध्द, तरुण, विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना बस वेळेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या अकलूजहुन सांगोलाकडे जाणारी बस आहे. त्या एस.टी. बसची वेळ ४.१५ ते ४.३० दरम्यान प्रवास वेळ असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी रात्री ८.०० वाजेपर्यंत माळेवाडी कॉलेजजवळ व अकलूज नवीन एसटी स्टँड वर थांबावे लागत आहे. तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज माळेवाडी कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या हितासाठी बस थांबाचा फलक लावून तिथे थांबण्याची सोय करावी, जेणेकरून विद्यार्थी तेथेच थांबतील लगेच त्यांना आपल्या गावी जाता येईल. रस्त्याच्या बाजूला उभे राहून एखाद्या अपंग व्यक्तीने हात केला तर त्यांना ड्राइव्हरकडून नेले जात नाही, शेतकरी, कामगार, शेतमजुर, अपंग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या ये-जा प्रवासाच्या बाबतीत येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या त्रास आपल्या प्रशासन यंत्रणेकडून होणार नाही, याची दक्षता घ्यावी‌. अन्यथा अनोखे आंदोलन करून आपल्या प्रशासनाला जागं करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी निवेदनात दिला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सागर दुपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख अजित कोडग, विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख शिवराम गायकवाड, माळशिरस विधानसभा प्रमुख साहिल आतार, समाधान काळे, तेजस भाकरे, आहील पठाण, सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort