दत्त मंदिर ते न्यायालय रस्ता आठ दिवसांत दुरुस्त करू, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन
बाळासाहेबांचे शिवसेनेने उठवला आवाज…
करमाळा (बारामती झटका)
दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता कोणाच्या मालकीचा, हा वाद सुरू असताना या प्रश्नात बाळासाहेबांच्या शिवसेनेची जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उडी घेतल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्ता दुरुस्त झाल्यानंतर तात्काळ करमाळा नगरपालिकेने हा रस्ता हस्तांतरित करून स्वतःकडे घ्यावा या अटीवर जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याने तात्काळ या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्याची ठरवले असून लवकरच वरिष्ठ कार्यकारी अभियंता कुलकर्णी या कामाची सुरुवात करतील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य अधिकारी कमुनेकर यांनी दिली आहे.
करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे दीर्घकालीन रजेवर असून त्यांनी उद्या तात्काळ नगरपालिकेच्या वतीने रस्ता दुरुस्त करून आमच्या ताब्यात द्यावा असे पत्र दिल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. दरम्यान, पाच फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व महत्त्वाचे न्यायालयीन अधिकारी करमाळातील प्रशासकीय साठी करमाळ्यात येणार असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा लेखी पत्राद्वारे जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याला तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण असायच्या सूचना दिलेल्या आहेत.
दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता जाणीवपूर्वक राजकीय वादातून दुरुस्त करण्याची टाळाटाळ केली जात होती. दोन दिवसापूर्वी उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला सुदैवाने जवळपास पाच विद्यार्थी मरता मरता या दुर्घटनेतून वाचले, याचीही नोंद प्रशासनाने घेतली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी गंभीर घटना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगितली, तात्काळ कारवाईची सूत्रे हलली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमुनेकर रस्ता मजबूत खडीकरण व डांबरीकरण याबाबत उद्या आदेश पारित करतील, असा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता दुरुस्त करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला असून दोन दिवसात यावर ठोस कारवाई होईल. असा मला विश्वास आहे. हा रस्ता दुरुस्त करणे गरजेचे असून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता करावा असा प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. – मनोज राऊत, गट विकास अधिकारी करमाळा
दत्त मंदिर ते न्यायालय हा रस्ता दुरुस्त करून आमच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव आला तर आम्ही तात्काळ याबाबत योग्य निर्णय घेऊ. हा रस्ता नगरपालिकेच्या हद्दीत असला तरी आमच्याकडे मालकी नाही. याकडे या रस्त्याची मालकी आल्यानंतर नपा फंडातून त्याची देखभाल करू. – बालाजी लोंढे, मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका
रस्त्याची मालकी घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व नगरपालिका खाते टाळाटाळ करत होते. तरीसुद्धा यापूर्वीच्या काळात या रस्त्यावर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च कोणत्या खात्याने कशासाठी केले, हा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे आता हा रस्ता दुरुस्त करून तात्काळ नगरपालिकेने ताब्यात घ्यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचा असल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना.
3 फेब्रुवारी पूर्वी रस्ता न झाल्यास हजारो विद्यार्थ्यासह या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू व पोकलेनच्या साह्याने पूर्ण रस्ता उकडून टाकू, असा इशाराही महेश चिवटे यांनी दिला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative and funny! For further reading, check out: DISCOVER HERE. What’s your take?