माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रतिष्ठित गाव कण्हेर ग्रामपंचायतीचा गड राखण्याकरता नेते व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…
ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच नेते व कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू झाल्या…
कण्हेर ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित समजले जाणारे मौजे कण्हेर ग्रामपंचायतीचा गड अबाधित राखण्याकरता नेते व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झालेली आहे. ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम काही महिन्यावर येऊन ठेपलेला आहे, अजून कार्यक्रम जाहीर झालेला नाही. कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर नेते व कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. कण्हेर गावामध्ये नेते व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न होऊन पुन्हा एकदा एकजूट असल्याचे हात उंचावून सर्वांनी एकत्र असल्याची एक प्रकारे विरोधी गटाला दाखवून एकीच्या बळा प्रदर्शन केलेले आहे.
यावेळी बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, पोपट माने सरपंच कण्हेर, यशवंत माने, भरत माने, धनाजी माने माजी सरपंच कण्हेर, वसंत पाटील, धर्मराज माने, बबन माने, कांता रुपनवर, नवनाथ अर्जुन, दत्ता माने, राजेंद्र गोसावी, दत्ता देवकाते, विजय शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी माने, नारायण माने, अजिनाथ पाटील, महादेव वाघमोडे, मच्छिंद्र पाटील, गणेश माने, मनोज पालवे, मोहन पवार, बाबा दुधाळ, अभिजीत गुरव, युवराज पाटील, गणेश काळे, बापूराव बुधावले, आप्पा माने, विलास बुधावले, हनुमंत सरगर, अनिल पिंजारी, शिवाजी काळे, धनाजी काळे, विजय सरगर, जयसिंग काळे, विठ्ठल बोडरे, आनंदा माने, सुरेश राऊत, धुळा काळे, विश्वनाथ बोडरे यांच्यासह गावातील आजी-माजी प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अनेक विषयावर सल्लामसलत झाली. भविष्यात गावाची राजकीय दिशा व विकासाचा कार्यक्रम कसा असेल, याविषयी सकारात्मक चर्चा झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng