प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या पैलवानाचा अखेर जामीन मंजूर

वेळापूर (बारामती झटका)
अकलूज या ठिकाणी एका केसमध्ये श्री. साजिद भाई सय्यद यांना गोवण्यात आले. दि. 18 डिसेंबर 2023 रोजी माळशिरस येथील न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर ठरवला. आज सकाळी वेळापूर या ठिकाणी श्री. साजिदभाई सय्यद यांचा माळशिरस तालुक्याच्या जनतेचे आमदार लोकनेते श्री. उत्तमरावजी जानकर साहेब (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि याच वेळी मला सुरेश भटांची कविता आठवली……
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…… पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…।।
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर
डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान
तरी वाट चालतो
अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही ….
ही कविता वाचल्यानंतर खरा संघर्षयोद्धा हा कधीही कुणासमोर झुकत नाही, वाकत नाही…. तू कायम प्रस्थापितांच्या विरोधात आपला कणा ताठ ठेवत असतो.. कारण प्रस्थापितांच्या विरोधात कायम लढत राहणे…. हाच त्याचा स्वार्थ असतो. अकलूज मधल्या रामायण चौकात ज्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात सभा लावली जाते, त्यावेळी शंभर टक्के त्यांच्यावर येणाऱ्या काळात अन्याय होणार. हे त्यालाही माहीत असते. तरीही तो त्यांच्या विरोधात झुंजत राहतो.

जामीन मंजूर झाल्यानंतर या महाराष्ट्राच आराध्य दैवत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो, त्याचं नाव साजिदभाई सय्यद……. विठ्ठलानंतर आपल्या सर्वात आवडत्या संघर्षयोद्धा नेत्याला भरल्या डोळ्यांनी भेटण्यासाठी येतो, त्याचं नाव साजिद सय्यद…..
एखाद्या माणसावर किती अन्याय व्हावा आणि कितपत व्हावा… एवढा अन्याय झाल्यानंतर किंबहुना माणूस जगूही शकणार नाही. परंतु, ही माणसं आजही संघर्षाच्या जोरावर… छाती ठोकून उभाच राहतात.


माळशिरस तालुक्यामध्ये लोकनेते श्री. उत्तमराव जानकर साहेबांनी तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी जी माणसं तयार केलेली आहेत, त्यांची एक वेगळीच ऊर्जा आहे. आणि त्यांचा हा ऊर्जास्त्रोत कायम उभा आहे तो पर्वतासारखा. प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना आपल्याला नेमकं काय मिळणार ? याचीही तो कधी दखल घेत नाही, परंतु तो लढतो, तो इतिहासात आपले कुणीतरी नाव घ्यावे यासाठी… आणि निश्चितपणे माळशिरस तालुक्याचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल, त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा एक अवलिया श्री. साजिद भाई सय्यद यांचे नाव कायम घेतले जाईल..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.