अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांना निलंबित करा : राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे यांना निलंबित करून गुन्हा नोंद करण्याच्या परवानगीसाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे उत्तमराव जानकर यांचा अर्ज दाखल.
सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे यांना निलंबित करून गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केलेला आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जात अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, ता. माळशिरस या संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांनी निवडणूक कामासाठी श्री. मालोजीराजे शहाजीराव देशमुख रा. नातेपुते, यांना थकीत घरपट्टी व गाळा भाडे अनुक्रमे 736 व गाळा भाडे 29 हजार 700 रुपये थक असताना बे बाकी दाखला दिलेला आहे. सदर प्रकरणी कोणतेही रेकॉर्ड न पाहता दोन्ही वर्षांमध्ये हा उमेदवार थकबाकीदार आहे. एडिट रिपोर्टमध्ये तशा नोंदी आहेत. श्री. मालोजीराजे देशमुख यांना दि. 5/4/2023 रोजी निवडणूक अधिकाऱ्यास बे बाकी दाखला सुपूर्त केला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज मंजूर केला. त्यामुळे श्री. राजेंद्र काकडे यांचे निलंबन करून निवडणूक कामांमध्ये फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यास आपली परवानगीचे पत्र देण्यात यावे, असा तिकीट लावून तक्रारी अर्ज दिलेला आहे. सदरच्या अर्जावर जिल्हा उपनिबंधक काय निर्णय घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng