Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

नातेपुते येथे उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर व पै. अक्षय शिंदे पुणे यांच्यात १ लाख ५१ हजार इनामावर लढत होणार.

श्री शंभू महादेव श्रावणी भंडार उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे मैदानासाठी श्री शंभू महादेव आखाड्याची तयारी पूर्ण

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे श्री शंभू महादेव श्रावणी भंडारा उत्सव निमित्त सोमवार दि. 15/8/2022 रोजी महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांच्या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान श्री शंभू महादेव आखाडा पाण्याच्या टाकीजवळ नातेपुते येथे संपन्न होणार आहे. सदर कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज जागेची सोय करण्यात आली आहे.

सदर कुस्ती मैदानात १ लाख ५१ हजार रुपये इनामावर उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर सदाशिवनगर, गंगावेस तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा आणि पै. अक्षय शिंदे पुणे, मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र वस्ताद पंकज हरपुडे यांचा पठ्ठा यांच्यामध्ये लढत होणार आहे.

१ लाख एकवीस हजार रुपये इनामावर पै. माऊली कोकाटे, हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा आणि पै. वेताळ शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे, वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

१ लाख इनाम रुपयावर पै. संतोष दोरवड, शाहूपुरी तालीम कोल्हापूर, वस्ताद उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील यांचा पठ्ठा आणि पै. कार्तिक काटे कर्नाटक केसरी यांच्यात लढत होणार आहे.

७५ हजार रुपये ईनामावर दोन कुस्त्या होणार आहे. पै. महारुद्र काळेल शिवराय कुस्ती केंद्र कुर्डूवाडी, वस्ताद असलम काझी यांचा पठ्ठा व पै. शुभम शिदनाळे, शिवरामदादा कुस्ती केंद्र पुणे, वस्ताद महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा पठ्ठा यांच्यामध्ये लढत होणार आहे. पै. गणेश कुंकुले, शाहूपुरी तालीम कोल्हापूर, वस्ताद रवींद्र पाटील यांचा पठ्ठा आणि पै. बंटी कुमार विजय शाहू आखाडा कोल्हापूर, वस्ताद सादिक पटेल यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

५० हजार रुपये इनामावर सहा कुस्त्या होणार आहेत. पै. वैभव माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे, वस्ताद काकासाहेब पवार यांचा पठ्ठा आणि पै. सुदेश ठाकूर हांडे पाटील तालीम सांगली, वस्ताद कौटगेंडा पाटील यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पै‌. दादुमिया मुलाणी शिवराय कुस्ती केंद्र कुर्डूवाडी, वस्ताद असलम काझी यांचा पठ्ठा व पै. संतोष जगताप शिवनेरी तालीम अकलूज, स्व. वस्ताद दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा त्यांच्यात लढत होणार आहे. पैलवान आदर्श सोरटे शिवतीर्थ कुस्ती केंद्र नातेपुते, वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा व पैलवान प्रमोद येवले हांडे पाटील तालीम सांगली वस्ताद कौटगेंडा पाटील यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पै. तानाजी विरकर, वस्ताद नामदेव बडरे यांचा पठ्ठा व पै. प्रकाश नरोटे, कर्मवीर बाबासाहेब पाटील कुस्ती केंद्र सदाशिवनगर, स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पै. आशिष वावरे शिवतीर्थ कुस्ती केंद्र नातेपुते वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा आणि पै. दादा सरोदे हनुमान आखाडा पुणे, वस्ताद गणेश दांगट यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पै. धनाजी कोळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे, वस्ताद काकासाहेब पवार यांचा पठ्ठा आणि पै. भरत लोकरे हनुमान आखाडा पुणे, वस्ताद गणेश दांगट यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

२१ हजार रुपये इनामावर दोन कुस्त्या होणार आहेत. पै. रोहित नेटवे शिवतीर्थ कुस्ती केंद्र नातेपुते, वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा आणि पै. यश पाटील शिवराम दादा तालीम पुणे, वस्ताद अभिजीत कटके यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पै‌. सतपाल सोनटक्के वस्ताद उमेश काका इंगळे यांचा पठ्ठा आणि पै. मारुती सूर्यवंशी राष्ट्रकुल तालीम कोल्हापूर, वस्ताद सारंग सर यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानामध्ये पै. अशपाक मुलाणी, पै. यश काळे, पै. शंभू लाळगे, पै. अभिषेक पांढरे, पै. श्री पलंगे, पै. रोहन दडस, पै. प्रसाद पांढरे, पै. यशराज हिरालाल मोरे, पै. रणवीर देविदास काळे यांचे विशेष आकर्षण आहे. सदर कुस्ती मैदानास हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, सर्व वस्ताद मंडळी व कुस्ती शौकीन यांची उपस्थिती राहणार आहे.

सदर कुस्तीचे समालोचन वस्ताद शंकरआण्णा पुजारी कोथळीकर हे करणार आहेत. तरी सर्व कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त नातेपुते ग्रामस्थ व श्री शंभू महादेव श्रावणी भंडार उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button