Uncategorized

नातेपुते येथे महाराष्ट्रातील समस्त रुपनवर पाटील परिवार यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.

कुलदैवत बनशंकरी देवी मंदिर परिसर विकास व समस्त रुपनवर पाटील यांच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शक दिशा ठरविण्यात आली.

नातेपुते ( बारामती झटका )

कर्नाटक राज्यातील बदामी येथील कुलदैवत बनशंकरी देवी असणाऱ्या समस्त रुपनवर पाटील यांचा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी दि. 27/10/2022 रोजी सकाळी 10 वा. राज आनंद मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे महाराष्ट्रातील खेडोपाडी व शहरांमध्ये राहत असलेले समस्त रुपनवर पाटील परिवार यांच्या स्नेह मेळाव्यात बनशंकरी देवी मंदिर तसेच रुपनवर पाटील परिवारातील भावी पिढीच्या शिक्षणासाठी कशाप्रकारे योगदान देता येईल असा संकल्प मेळाव्यामध्ये करण्यात आला. दर सहा महिन्यांनी एकमेकांच्या शैक्षणिक, सामाजिक, उद्योग व्यवसाय वाढीसाठी एकमेकांना सहकार्य करण्याचा मनोदय करण्यात आला.

सदर मेळाव्याचे आयोजन भूमी अभिलेख उपसंचालक विलास रुपनवर पाटील, सुप्रसिद्ध व्याख्याते भाषण क्लास व होम मिनिस्टर निवेदक अनिल रुपनवर पाटील, राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारत सरकार नोटरी ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांनी केलेले होते.

कर्नाटक राज्यात मुळगाव बदामी असणारे रुपनवर पाटील उद्योग व्यवसाय व शेती करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले रुपनवर पाटील एकत्र आलेले होते. त्यामध्ये माळशिरस तालुक्यात कुरभावी, एकशिव, डोंबाळवाडी, हनुमानवाडी, कारूंडे, फडतरी, लोणंद, मांडवे, कण्हेर, इस्लामपूर, भांब, नातेपुते, फोंडशिरस, पळसमंडळ, इंदापूर तालुक्यातील जांब, चाकाटी, सांगोला तालुक्यातील दापोडी, उरळी कांचन, लोणी-काळभोर, उस्मानाबाद, यवतमाळ, पुणे, मुंबई, सांगली अशा महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये समस्त रुपनवर पाटील परिवारातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध क्षेत्रात नोकरी, वकिली, डॉक्टर, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्र, प्रगतशील शेतकरी, सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये विखुरलेले अनेक बंधू भगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती. सदर मेळाव्यात गिनीज बुकमध्ये योगदान असलेले प्राजक्ता सुनील रुपनवर व रुपनवर पाटील महिला सरपंचांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रामहरी रुपनवर हे होते.

यावेळी व्यासपीठावर श्री. विलास पाटील, डॉ. वसंतराव रुपनवर पाटील, शिवाजी नाना रुपनवर पाटील, मारुती रुपनवर ॲड. प्रशांत रुपनवर पाटील, TV9 रिपोर्टर प्राजक्ता रुपनवर पाटील, अमरजा रुपनवर पाटील आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रुपनवर पाटील, यांनी केले तर आभार ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button