ताज्या बातम्या

निंभोरेत शिवधर्म पद्धतीने केले अस्थिविसर्जन…..

माजी आमदार नारायणआबा पाटील, प्रदीपमामा जगदाळे, नामदेवनाना वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

करमाळा (बारामती झटका)

निंभोरे, ता. करमाळा जिल्हा सोलापूर येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दिलीप युवराज सांगडे यांचे धाकटे बंधू विजय युवराज सांगडे यांचे दि. 10 जुलै रोजी आकस्मित निधन झाले होते. स्मृतिशेष विजय सांगडे यांचे अस्थि विसर्जनाचा म्हणजे तिसरा दिवस जुन्या रूढी परंपरांना फाटा देत शिवधर्म पद्धतीने अस्थिविसर्जित करण्यात आल्या. ज्या ठिकाणी स्मृतिशेष विजय सांगडे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्याच्या शेजारीच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या वृक्षांची लागवड कै. विजय सांगडे यांचे वडील, आई, सर्व बंधू, मुले तसेच पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, माजी आमदार नारायण आबा पाटील, प्रदीप मामा जगदाळे, नामदेवराव वाघमारे, पोपटराव वाघमारे, विष्णू वाघमारे, विलास पाटील, बासूभाई मुलाणी, हिम्मत सोलनकर, मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष सचिन काळे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, कैलास काकडे, रवी वळेकर, कांबळे सर, डॉ. अमोल माने, योगेश माने, निंभोरे येथील पंडित वळेकर तसेच सांगडे परिवाराच्या सर्व नातेवाईकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कै. विजय सांगडे यांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता वृक्षारोपणवेळी वृक्षारोपणासाठी घेतलेल्या खड्ड्यात विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सदरवेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, वाघोलीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले. कै. विजय सांगडे यांचे उर्वरित विधी म्हणजे दहावा दहाव्या दिवशी न घेता पाचवे दिवशी घेण्याचा निर्णय सांगडे कुटुंबाने त्या ठिकाणी व्यक्त केला. त्यानुसार स्मृतिशेष विजय सांगडे यांचा दहावा म्हणजे दशक्रिया विधी शुक्रवार दि. 14 जुलै रोजी अकलूज येथील अकलाई घाटावर होणार असल्याचे सांगितले.

सदरवेळी अकलूज, वाघोली, शेवरे, टेंभूर्णी, कंदर, जेऊर तसेच निंभोरे येथील सांगडे परिवाराचे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button