Uncategorizedताज्या बातम्या

पार्थकान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार

पानिव (बारामती झटका)

पानिव ता‌. माळशिरस येथे पार्थकान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पानिव विजयवाडी, गट नंबर १०८ चा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. २४/३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जागीरदार, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद जगन्नाथ मोरे, सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, नोडल अधिकारी स्मार्ट सोलापूर तथा आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, माळशिरस तालुका कृषी अधिकारी श्रीमती पुनम चव्हाण, युनिटी ऍग्रो मॅन्युफॅक्चरर अँड एक्सपोर्टरचे निवृत्ती गोदाजी, सोलापूर मुल्य साखळी तज्ञ (स्मार्ट प्रोजेक्ट) सूर्यकांत मोरे, पुणे विभागीय संपादन अधिकारी (DIU) सुनील शेलार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कुलदीप ढेकळे, फलटण येथील ॲग्री एचडीएफसी बँकेचे मॅनेजर संतोष धायगुडे, शास्त्रज्ञ KVK मोहोळ च्या सौ. काजल जाधव, अकलूज मंडल कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड यांची असणार आहे.

तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पार्थकान्हा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पानिवचे अध्यक्ष सुनील सुधाकर लावंड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. This article really resonated with me. The points made were compelling. Id love to hear more opinions. Click on my nickname for more!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort