ताज्या बातम्याशैक्षणिक

पिलीवची कन्या कु. मोहिनी रघुनाथ देवकर विधीज्ञ (वकील) परीक्षेत विशेष प्राविण्यातून उत्तीर्ण

पिलीव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कु. मोहिनी रघुनाथ देवकर हिने सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत झालेल्या एलएलबी या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यातून यश संपादन करून विधीज्ञ (वकील) ही पदवी मिळवली. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपालीताई चाकणकर यांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले.

कु. मोहिनी देवकर हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आजोबा गणपत बाळा देवकर (बोतेकर) यांची तीव्र इच्छा पूर्ण करून देवकर परिवारामध्ये पहिली महिला वकील (विधीज्ञ) होण्याचे स्वप्न साकार केले. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा पिलीव, तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कै. रमेश खलीपे कनिष्ठ महाविद्यालय, पिलीव आणि महाविद्यालयीन शिक्षण (बी.एस्सी.) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (कमवा, शिका योजना) पंढरपूर या ठिकाणी झाले. तर विधी पदवीचे शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील शिवाजी मराठा लाॅ कॉलेज या ठिकाणी पूर्ण केले. कायद्याची पदवी विशेष प्राविण्‍यातून मिळवल्यावर देवकर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कु. मोहिनी रघुनाथ देवकर यांच्याशी आमचे प्रतिनिधींनी संवाद साधला असता तिने आपल्या खडतर परिस्थितीचा पाढा वाचून मी एल.एल.एम ची पदवी घेऊन परिवाराचे व माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य करून साथ दिली त्यांचे स्वप्न भविष्यात साकार करणार असल्याचे बोलून दाखवले. या यशामध्ये माझे शिवाजी मराठा लॉ कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ पाटील सर, अंजली गवळी मॅडम, आनंद बोकेफोडे सर, मकवाना सर, सिद्धकला भावसार मॅडम, सुमित सर व सर्व स्टाफ तसेच अश्विनी पाटील मॅडम, सुरेखा पाटील, माझे पहिली पासूनचे सर्व गुरुजन वर्ग, डॉ. चांगदेव कांबळे सर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे शाखाधिकारी श्री. विशाल देवकर व सौ. दिपाली देवकर तसेच देवकर परिवार, सद्गुरु परिवार व असे अनेक की ज्यांची नावेही कमी पडतील असे सर्वच माझे हितचिंतक, रामायण समिती व सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी, ह.भ.प. हरिहर नंदन महाराज व सर्व परमेश्वर व सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभल्यामुळेच मी परिवाराचे स्वप्न पूर्णत्वाच्या मार्गाकडे नेत असल्याचे बोलून दाखविले.

तिच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषद कृषी समितीचे मा. सभापती संग्रामसिंह जहागीरदार, सद्गुरू कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरीराव सर, व्हाॅ. चेअरमन डाॅ. बाळासाहेब कर्णवर, संचालक उषाताई मारकड, उदय जाधव, पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते, गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, श्रीराम गणेश मित्र मंडळ व श्री दुर्गा माता नवरात्र मंडळ, श्रीराम गल्ली पिलीव व अनेक मान्यवर व हितचिंतकांनी कु. मोहिनी देवकर हिचे अभिनंदन व कौतुक केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button