पिलीव गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन माळी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
लोकनियुक्त सरपंच नितीन माळी यांनी पीडित महिलेला लोणावळा येथे घेऊन जाण्याचे दिले आश्वासन
पिलीव ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच नितीन विठ्ठल माळी यांनी थेट महिलेचा पाठलाग करून लोणावळा येथील नर्सरीमध्ये ठेवण्याचे आश्वासन देऊन महिलेचा विनयभंग करून पाठलाग केलेला असल्याने माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 539/22 दि. 5/11/2022 रोजी लोकनियुक्त सरपंच नितीन विठ्ठल माळी व ग्रामपंचायत कर्मचारी श्रीनिवास महामुनी यांच्यावर 354 ड, 341, 34 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला आहे.

महिलेने माळशिरस पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिलेला होता. सदरच्या अर्जामध्ये लोकनियुक्त सरपंच नितीन विठ्ठल माळी यांनी एकटीला गाठून पाठलाग करून लोणावळा येथे नर्सरीमध्ये घेऊन जाऊन अश्लील असे भाष्य करून पाठलाग केलेला आहे. त्यांना सहकार्य श्रीनिवास महामुनी यांनी केलेले आहे, अशी फिर्याद माळशिरस पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अभिजीत कणसे तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत आरोपी सरपंच नितीन माळी व कर्मचारी श्रीनिवास महामुनी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
माळशिरस तालुक्यात लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच यांनी थेट महिलेचा विनयभंग करून अश्लील भाष्य बोलणारे पहिलेच सरपंच असावेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात खळबळ माजलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
