पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”, निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता पूर्ण करून जनतेला दिलेला शब्द पाळला…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस विधानसभा मतदार संघात मोटेवाडी माळशिरस येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयाचा निधी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंजूर करून निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता करून जनतेला दिलेला शब्द पाळलेला असल्याने ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’, या म्हणीचा प्रत्यय लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकांसाठी दमदार निधी मंजूर करवून दिल्याने आला आहे. त्यामुळे अहिल्यादेवी प्रेमीमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विजयाचे चाणक्य आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी आमदार राम सातपुते यांना मिळालेली होती. पहिल्या अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असताना मतदार संघामध्ये विकासकामे करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्यातून माळशिरस तालुक्यातील जनतेचे अडीअडचणीचे प्रश्न सोडविणे व विकासकामे करण्याचे काम सुरू होते.
मात्र, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते यांनी विकासकामांचा धुमधडाका सुरू केलेला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी माळशिरस तालुक्यातील विकासकामांना घेतलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य स्वच्छता, मंदिरांना सभा मंडप व विविध समाजांना समाजमंदिर अशी कामे करण्याचे काम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात एकही गाव किंवा वाडी, वस्ती विकासापासून वंचित ठेवलेली नाही. राज्यामध्ये भाजपच्या विचाराचे सरकार असल्यामुळे अनेक दिवसांपासून अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न मिटलेला आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते मनामध्ये मनोमन इच्छा होती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी वचन नाम्यामध्ये तालुक्यातील जनतेला शब्द दिलेला होता तो शब्द पूर्ण करण्यास सरकारची अडचण असल्याने तात्काळ प्रश्न मार्गी लागला नाही. तोपर्यंत तालुक्यातील वाचाळवीर उलटसुलट चर्चा करीत होते. दोन कोटी रुपये मंजूर करून 50 लाखाचा पहिला टप्पा मंजूर झालेला असून जिल्हा परिषदेकडून वर्ग झालेला आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दोनच दिवसावर आलेली आहे. जयंतीच्या पूर्व संध्येला स्मारकासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असल्याने अहिल्यादेवी प्रेमीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माळशिरस तालुक्यात लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी जनतेला अडीअडचणी व प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे, सर्वांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार सुरू करून जनतेचे प्रश्न तात्काळ सोडविले जात आहेत. अनेक लोकांचे व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये आपली कैफियत मांडली जाते. तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली असल्याने आरोग्यदूत या नावाने आमदार राम सातपुते यांची नव्याने ओळख झाली आहे.
सर्वसामान्य व गोरगरिबांची अनेक अवयवाची मोफत ऑपरेशन व शस्त्रक्रिया करून जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे. कितीतरी वर्षापासून व्याधीने त्रस्त असलेले पण, पैशांअभावी रखडलेली ऑपरेशन करून अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर आ. राम सातपुते यांच्या रूपाने आनंद तरळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
[url=http://torsite.biz]http://torsite.biz[/url]
[url=http://torlinks.site]http://torlinks.site[/url]