पुरंदावडे करांनी पोलीस उपनिरीक्षक मयूर सुळे पाटील व रोहित सोनटक्के यांचे जंगी स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पुरंदावडे गावचे सुपुत्र मयूर बाळासो सुळे पाटील व5 रोहित राजकुमार सोनटक्के यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे.
पुरंदावडे ( बारामती झटका )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश संपादन करून माय भूमी मध्ये आलेले चिरंजीव मयूर बाळासो सुळे पाटील व चिरंजीव रोहित राजकुमार सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक पदावर यश संपादन करून पुरंदावडे गावामध्ये नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच गावामध्ये येत असल्याने पुरंदावडे करांनी पोलीस उपनिरीक्षक मयूर सुळे पाटील व रोहित सोनटक्के यांचे फटाक्यांच्या आकाशबाजीत व हलगीच्या कडकडाटामध्ये जंगी स्वागत करून उघड्या जीपमध्ये भव्य दिव्य मिरवणूक गावांमधून काढलेली आहे.


चिरंजीव मयूर सुळे पाटील व चिरंजीव रोहित सोनटक्के यांचे जंगी स्वागत पुरंदावडे करांनी केलेले होते. त्यावेळेस पुरंदावडे गावच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ.राणी बापू मोहिते, माजी सरपंच भगवानराव पिसे आनंद नगरचे माजी उपसरपंच वसंतराव गायकवाड, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व माजी सरपंच विष्णुपंत ओवाळ, ज्येष्ठ नेते वसंतराव ढगे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच देविदास उर्फ बाळासाहेब डोपे, पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासो आत्माराम सुळे पाटील, सोलापूर जिल्हा परीट समाज संघटनेचे संघटक दयानंद पवार, मावळ पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी राजकुमार सोनटक्के, प्याजो चे मॅनेजर हेमंतकुमार लोंढे, पुरंदावडे गावचे पोलीस पाटील शेखर ओवाळ पाटील महादेव बोराटे दादा मोहिते यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासो आत्माराम सुळे पाटील व सौ सुनीता सुळे पाटील यांना मयूर व आकाश दोन मुले आहेत आकाश बीकॉम झालेला आहे तर मयूर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारलेली आहे.

राजकुमार ज्ञानदेव सोनटक्के यांचे मूळ गाव पुरंदावडे आहे सध्या तळेगाव दाभाडे येथे राहत आहेत मावळ पंचायत समिती मध्ये ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत राजकुमार सोनटक्के व सौ आशा सोनटक्के यांना रोहित व रोहन अशी दोन मुले आहेत रोहित यांना चुलत बहीण बागलकोट येथे कॅनरा बँकेमध्ये कार्यरत असणाऱ्या राखी लोंढे सोनटक्के व प्याजो कंपनीत मॅनेजर असणारे दाजी हेमंत लोंढे यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे.


पुरंदावडे गावांमधील मयूर सुळे पाटील व रोहित सोनटक्के दोन्हीही गावच्या सुपुत्रांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारलेली असल्याने समस्त पुरंदावडे करांनी जंगी स्वागत करून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng