Uncategorizedताज्या बातम्या

पुरंदावडे गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

भव्य बैलगाडी शर्यत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार..

पुरंदावडे (बारामती झटका)

पुरंदावडे ता. माळशिरस गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रा सालाबादप्रमाणे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भव्य बैलगाडी शर्यत, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी यात्रा महोत्सव समिती पुरंदावडे सदाशिवनगर समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

महालक्ष्मी यात्रा सोमवार दि. 10/04/2023 ते बुधवार दि. 12/04/2023 कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचे आयोजन शुक्रवार दि. 07/04/2023 रोजी संपन्न होणार आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस रोख रक्कम 41 हजार रुपये व ढाल, दुसरे बक्षीस रोख रक्कम 25 हजार व ढाल, तिसरे बक्षीस 15 हजार रोख रक्कम व ढाल, चौथे बक्षीस 10 हजार रुपये रोख रक्कम व ढाल, पाचवे बक्षीस 7 हजार रुपये व ढाल अशी बक्षिसे राहणार आहेत. प्रवेश फी 1 हजार रुपये राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. गाडी मालक चालक यांनी अक्षय अर्जुन 8803711100, अण्णा अर्जुन 911943003 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

महालक्ष्मी देवीचा अभिषेक व महापूजा सौ. प्राजक्ता व श्री. देविदास ढोपे, पुरंदावडे गावचे विद्यमान उपसरपंच या उभय पती-पत्नीच्या शुभहस्ते सोमवार दि. 10/04/2023 रोजी पहाटे ५ वाजता होणार आहे. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे. मंगळवार दि. 11/4/2023 रोजी महानैवद्य मनपसंत भोजनाचा आस्वाद मित्रपरिवार व नातेवाईक यांना मिळणार आहे. करमणुकीसाठी संजय बजरंग हिवरे लोकनाट्य तमाशा मंडळ पुरंदावडे यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. देवीचा छबिना रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे. बुधवार दि. 12/04/2023 रोजी सायंकाळी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान होणार आहे. सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत 50 पासून हजार रुपये पर्यंत कुस्त्या नेमल्या जातील. सर्व कार्यक्रमासाठी भाविक भक्त यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महालक्ष्मी यात्रा महोत्सव समिती पुरंदावडे सदाशिवनगर व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button