प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसाय, समाजकारण आणि राजकारण करून गरुडभरारी घेऊन उंच शिखरावर पोहोचलेला उराडे परिवार
‘रत्नकुंड निवास’ या उराडे परिवाराच्या नवीन वास्तूचा सत्यनारायण, महापूजा व गृहप्रवेश
नातेवाईक व मित्रपरिवार यांना सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचे निमंत्रण
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते ता. माळशिरस येथे रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी नऊ वाजता ‘रत्नकुंड निवास’ या नवीन वास्तूचा सत्यनारायण, महापूजा व गृहप्रवेश कार्यक्रम आझाद चौक, खाटीक गल्ली, नातेपुते येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये येऊन भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कुंडलिक गणपत उराडे, अमोल कुंडलिक उराडे, गणेश कुंडलिक उराडे आणि समस्त उराडे परिवार नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नातेपुते येथे स्व. सौ. रत्नमाला व श्री. कुंडलिक गणपत उराडे सर्वसामान्य व गरीब कुटुंब होते. त्यांना अमोल व गणेश दोन मुले तर अनिता सावळकर, सोमेश्वर व वनिता कुचेकर, फलटण अशा दोन मुली आहेत. कुंडलिक उराडे यांनी अतिशय प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून आपला प्रपंच चालवण्यास सुरुवात केलेली होती. सुरुवातीस भाडोत्री जागेमध्ये सायकल दुकान सुरू केलेले होते. त्यामध्येच तंबाखू, सुपारी व्यवसाय सुरू केलेला होता. उद्योग व्यवसायाच्या अफाट कष्टातून त्यांनी नातेपुते येथील एसटी स्टँड समोरील व्यापार पेठेत व आझाद चौकात खाटीक गल्ली येथे जागा खरेदी करून ठेवलेली होती. अमोल व गणेश यांच्या राम-लक्ष्मणासारख्या जोडीने गरीब व प्रतिकूल परिस्थिती आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये आई-वडिलांच्या सहकार्याने कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर आर्थिक प्रगती करून प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसाय, समाजकारण आणि राजकारण करून गरुडभरारी घेऊन उंच शिखरावर उराडे परिवार पोहोचलेला आहे.

अमोल यांनी वडिलांनी ज्या भाडोत्री जागेमध्ये सायकल दुकान व तंबाखू, सुपारीचा व्यवसाय करून आपला प्रपंच केला, त्या जागेमध्ये ओम शूज नावाने चप्पल दुकान 20 ते 22 वर्षांपूर्वी सुरू केलेले होते. गणेश यांनीही इतर आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने व्यवसाय करून आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे केलेली होती. आई-वडिलांच्या आशीर्वादाने अमोल आणि गणेश यांनी पेठेमध्ये खरेदी केलेल्या जागेत टोलेजंग इमारत बांधून भाडोत्री जागेतील चप्पल व बूट व्यवसाय स्वतःच्या जागेत सुरू केला. व्यवसाय वर्दळीच्या ठिकाणी सुरू केलेला असल्याने दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत गेली. आर्थिक प्रगती सुद्धा चांगली होत चाललेली होती. अमोल यांच्यामध्ये लहानपणापासून संघटन कौशल्य, मित्रांना अडचणीत सहकार्य करण्याची भावना, अंगामध्ये चळवळ करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी सुरुवातीस शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून सुरुवात केली. त्यांनी शिवसेनेत वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडल्याने त्यांना शिवसेना नातेपुते शहर अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे अमोल यांनी सोने केले. नातेपुते पंचक्रोशीमध्ये शिवसेना वाढविण्याचे काम सुरू केले. अमोल यांच्या कार्यावर वरिष्ठ नेते खुश होते. त्यांनी अमोल यांच्याकडे शिवसेना माळशिरस तालुका उपप्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. तालुक्यामध्ये सुद्धा अमोल उराडे यांनी निष्ठावान शिवसैनिक म्हणून नव्याने ओळख निर्माण केलेली आहे. राजकारणाबरोबर समाजकारणामध्ये उराडे परिवार यांचा सिंहाचा वाटा असतो. सार्वजनिक व व्यक्तिगत कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला जातो.

कुंडलिक उराडे यांना प्रतिकूल परिस्थितीत रत्नमाला यांची जशी साथ मिळत होती तशीच अमोल यांना दहिवडी तालुक्यातील बिदाल येथील सावळकर घराण्यातील सौ. रोहिणी यांची साथ मिळत आहे. तर गणेश यांना नीरा येथील भादेकर घराण्यातील सौ. सोनल यांची साथ मिळत आहे. सौ रोहिणी व श्री. अमोल यांना शिवम, सोहम, रिद्धी, सिद्धी अशी चार अपत्ये आहेत. त्यापैकी शिवम हा चप्पल दुकान व्यवसायामध्ये सहकार्य करीत आहे. उर्वरित तीन शिक्षण घेत आहे. सौ. सोनल व श्री. गणेश यांना साजिरी व सात्विक अशी दोन अपत्ये आहेत. सध्या त्यांचेही शिक्षण सुरू आहे. सौ. सोनल गणेश उराडे यांना नातेपुते ग्रामपंचायतमध्ये 2019 साली ग्रामपंचायत सदस्य होऊन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली होती.
प्रतिकूल परिस्थितीत उराडे परिवार यांनी अथक परिश्रम कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. दिवसेंदिवस आर्थिक प्रगती सुरू असताना अचानक उराडे परिवार यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. गेल्या सात वर्षांपूर्वी 2015 साली सौ. रत्नमाला उराडे यांचे आकस्मित दुःखद निधन झाले होते. उराडे परिवार दुःखातून सावरून पुन्हा जोमाने ताट उभा राहिलेला आहे. अमोल व गणेश यांनी प्रतिकूल परिस्थितीत वडिलांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये आई-वडिलांच्या पुण्याईने मनाच्या स्पंदनात रचलेले सुंदर स्वप्न वास्तवात उतरविले आहे. ‘रत्नकुंड निवास’ याची उभारणी केलेली आहे नवीन वस्तूला सुद्धा आई-वडिलांचे नाव दिलेले आहे.
श्री कुंडलिक उराडे, शिवसेना माळशिरस तालुका उपप्रमुख अमोल उराडे व उद्योजक गणेश उराडे त्यांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना नम्र विनंती आहे, आपणांस हस्ते पर हस्ते आमंत्रण निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घाईगडबडीत नजर चुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त उराडे परिवार यांच्यावतीने नम्र आणि कळकळीची विनंती आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
