प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण केलेले मानकी गावचे सुपुत्र युवा उद्योजक शत्रुघुनशेठ रणवरे
माळशिरस (बारामती झटका)
मांडकीसारख्या कायम दुष्काळी गावात जन्मलेले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शुन्यातून विश्व निर्माण केलेले युवा उद्योजक शत्रुघुनशेठ रणवरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत.
शत्रुघुनशेठ रणवरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय मांडकी येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण अकलूज येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण थोरले बंधू नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असल्याने त्यांच्याकडे मुंबई येथे झाले.
शत्रुघुनशेठ रणवरे यांनी गरिबीचे अनेक चटके खाल्ले होते. गरीबी काय असते ती जवळून अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी काही दिवस मुंबई येथे रोजीरोटीसाठी नोकरी केली. सुरुवातीच्या काळात मुंबई येथे त्यांना खूप संघर्ष करावा लागला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, त्याप्रमाणे अनेक घाव सोसून त्यांनी आपला संघर्षमय प्रवास केला. दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वत:चा व्यवसाय उभा करावा, हे नेहमी त्यांच्या डोक्यात सतावत होते. हीच प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबई येथे इलेक्ट्रीकल काँन्ट्रक्टर म्हणून छोटी मोठी कामे घेण्यास सुरवात केली. आज इलेक्ट्रीकल काँन्ट्रक्टर म्हणून मुंबई येथे चांगला जम बसविला आहे.
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिल्लाशी या उक्तीप्रमाणे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत जरी असले तरी जन्मभूमी मांडकी गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. गावातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यात तन, मन आणि धनाने मदत करतात. अशा उमद्या युवा उद्योजकास वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा. त्यांचे भावी आयुष्य सुख-समृध्दी, आरोग्यमय, आनंदमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng