प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर साहेबांचे आवाहन
लवंग (बारामती झटका)
शेतीपूरक नवउद्योग निर्माण व्हावेत यासाठी ग्रामस्थ लवंग आणि मंडळ कृषी अधिकारी अकलूज आयोजित आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाचे महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा सुभद्रा हॉल, लवंग येथे पार पडली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूरचे सर्जेराव तळेकर साहेब हे होते. गरजेनुसार आणि क्षमतेनुसार उद्योग उभा करून तो कार्यरत राहील, यासाठी लाभ घेणाऱ्या उद्योजकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी तळेकर साहेब यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा संसाधन अधिकारी समाधान खुपसे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच माळीनगर येथील गौरी सोहम गृह उद्योगाच्या संस्थापिका रुपाली पवार यांनी त्यांना आलेले अनुभव नवीन उद्योग उभा करणाऱ्या उपस्थितासमोर मांडले.
यावेळी संतोष सोनवणे मॅनेजर बँक ऑफ इंडिया अकलुज, यांनी बँकेबल प्रोजेक्टच्या संदर्भात असणाऱ्या शंकेचे निरसन करून अधिकाधिक चांगले प्रोजेक्ट सादर करण्याबाबत आवाहन केले. त्याचबरोबर धनंजय कपणे यांनी केळी पिकाविषयी लागवड ते काढणी पर्यंतची मार्गदर्शनपर माहिती दिली.
यावेळी कुबेर रेडे पाटील कृषिभूषण शेतकरी तसेच सतीश कचरे प्रभारी तालुका कृषी अधिकारी माळशिरस, दत्तात्रय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी अकलूज, डॉ. विक्रम दीक्षित पशुधन विकास अधिकारी, संजय फिरमे मंडळ अधिकारी महसूल विभाग, मोहन मिटकल ग्रामविकास अधिकारी लवंग, अकलूज कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच लवंग व पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लवंग गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरवदे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य धनाजी चव्हाण यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me hooked! For those curious, here’s more: DISCOVER MORE. What are your thoughts?
This article was very well-written and informative. Im curious about others’ opinions. Check out my profile for more!