फोंडशिरस येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला.
फोंडशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा फोंडशिरस येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला. सुरुवातीला गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
प्राथमिक शाळेत सर्वांचे स्वागत करून ध्वजारोहन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पै. सुनिल पाटील आणि ध्वज पूजन कार्यक्रम अध्यक्ष सरपंच पोपट बोराटे यांच्या हस्ते उपसरपंच दादासाहेब रणदिवे, गावातील सर्व माजी सैनिक व आजी माजी सदस्य, पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पोपट बोराटे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई हायकोर्टचे वकील अॕड. सतिश राऊत, अजित ढोपे उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यासह सर्वांनी ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन झाले.
विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत केली. यावेळी एकूण ६२ विद्यार्थ्याची भाषणे झाली. सहाय्यक निबंधक असणारे अजित ढोपे हे महानगरपालिका मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्त ही MPSC तील पुढील परीक्षा पास झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा तसेच अॕड. सतिश राऊत व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीकृष्ण ढोपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थितांनी भरभरून बक्षिसे दिली.
सदर कार्यक्रमास शिवाजी भाळे साहेब, मनोज गांधी, डॉ. भाळे, ग्रामसेवक बंडलकर, तलाठी वरवडे, बाबूराव वाघमोडे, लक्ष्मण जाधव, सर्व माजी स्वातंत्र्यसैनिक, सरपंच, उपसपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकातून मुख्याध्यापक संभाजीराव फुले यांनी शाळेच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी श्रीकृष्ण ढोपे व मुख्याध्यापक संभाजीराव फुले यांनी केले. तर उपशिक्षक कांतीलाल पोतलकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संभाजीराव फुले, शिक्षक कांतीलाल पोतलकर, शिक्षक प्रतिनिधी ढोपे सर, सुधीर गोरे, रुपाली कारंडे, प्रतिक्षा माने, सुगंधा गेगजे, संगिता शेतसंदी या सर्वांनी परिश्रम घेतले. खाऊवाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng