Uncategorizedताज्या बातम्या

बँक ऑफ इंडिया मॅनेजरचा सावळा गोंधळ, कर्ज भरणाऱ्या गाडीचा नंबर टाकण्याऐवजी भलत्याच गाडीचा नंबर टाकून दिव्यांगाची केली दिशाभूल….

बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांनी आरटीओ कार्यालयाला बँकेचा बोजा कमी करण्याकरता दिलेल्या पत्रात चुकीचा नंबर टाकून वाहन मालकाची हेळसांड केलेली आहे…

माळशिरस ( बारामती झटका )

#बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरस या बँकेचे शाखा अधिकारी समाधान कुंभार यांनी कर्ज भरणाऱ्या गाडीचा नंबर टाकण्याऐवजी भलत्याच गाडीचा नंबर टाकून दिव्यांग बांधवाची दिशाभूल केलेली आहे. बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरसचे मॅनेजर यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांना बँकेचा बोजा कमी करण्याकरता दिलेल्या पत्रात जाणीवपूर्वक चुकीचा नंबर टाकून वाहन मालक गोरख मारुती जानकर या दिव्यांग बांधवाची हेळसांड केलेली आहे.

हकीगत अशी कि, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरस यांचेकडून दि. १७/१०/२०१८ रोजी स्कार्पिओ गाडी एम एच ४५ एजे ९९९० ही गाडी बँकेमधून घेतलेली होती. सदरची गाडी दि. ०२/०३/२०२३ रोजी बँकेचे व्याजासह मुद्दल रक्कम भरून गाडीवरील लोन कमी केलेले होते. सदर बोजा कमी करण्याकरता गाव कामगार तलाठी यांना दि. १७/०३/२०२३ रोजी पत्र दिलेले होते. त्यामधील गट नंबर १२७ २ए व १२७ २ ब या वरील बोजा कमी करण्यासाठी पत्र दिलेले होते. स्कार्पिओ गाडीवरील आरसी पुस्तकांचा असणारा बोजा कमी करण्याकरता बँकेने दिलेले शाखा मॅनेजर समाधान कुंभार यांच्या सहीचे पत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिव्यांग बांधव गोरख मारुती जानकर यांना गेलेले होते. त्या ठिकाणी धक्कादायक व मनस्ताप होईल, अशा पद्धतीने बँकेच्या मॅनेजरने गाडीचा नंबर एम एच ४५ एजे ९९९० ऐवजी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने एमएच ४५ एजे १९९० टाकलेला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिव्यांग बांधव यांच्यावर वेगवेगळ्या शाब्दिक शब्दांमध्ये बोलले. पत्र तुम्ही खरेच बँकेचे आणले का बनावट आणलेले आहे, असा आरोप केला. दिव्यांग बांधवांची हेळसांड झालेली आहे. बँकेने केलेली चूक दिव्यांग बांधवांना भोगण्याची वेळ आलेली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपस्थित असलेले वाहनधारक, सर्व दिव्यांग बांधव गोरख मारुती जानकर यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्यामुळे गोरख जानकर यांना मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, दिव्यांगांचे आधारस्तंभ बच्चुभाऊ कडू, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, यांच्याकडे पत्रव्यवहार करून झालेल्या प्रकाराविषयी आवाज उठवून झोपेत असणाऱ्या बँक मॅनेजर यांची झोप उडवणार असल्याचे पीडित वाहनधारक गोरख मारुती जानकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button