बदलापूर येथे रेल्वे प्रवासी संघटनेची प्रथम सभा उत्साहात संपन्न
बदलापूर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून
बदलापूर, नेरळ, कर्जत येथील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी ध्रुव अकॅडमीचे संस्थापक संचालक महेश सावंत सर यांच्या कार्यालयात नियोजित प्रवासी संघटनेची प्रथम सभा आयोजित करण्यात आली होती. हंगामी अध्यक्ष अनिल लब्दे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेमध्ये महीलांसहीत २१ सभासदांनी स्वेच्छेने कार्यकारिणीत आपली नाव नोंदणी केली. या २१ सभासदांमधुनच पुढील बैठकीत अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सह सेक्रेटरी, कार्यकारिणी सदस्य यांची निवड करण्यात येईल असे ठरले.
याप्रसंगी नेरळ, कर्जत, बदलापूर येथील रेल्वे प्रवाशांनी तसेच महिला सदस्यांनीही आपले अनुभव व विचार व्यक्त केले. यावेळी सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, अनिल लब्दे यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. पाऊस जास्त प्रमाणात पडत असतानाही रेल्वे प्रवाशांची उपस्थिती लक्षणिय होती. शेवटी ध्रुव अकॅडमीचे संस्थापक संचालक महेश सावंत सर यांनी सर्वांचे आभार मानले. रेल्वे प्रवासी संघटनेची ही प्रथम सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
