बारामती येथील कॉलेजमध्ये फायर सेफ्टी कोर्स करा शंभर टक्के नोकरी मिळवा
बारामती (बारामती झटका)
ज्ञानयोग शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित ‘विवेकानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट’ कॉलेजची सुरुवात २०२०-२१ मध्ये शेतकरी योद्धाचे संपादक श्री. योगेश नालंदे सर व श्री. वसंतराव देवकाते साहेब यांच्या हस्ते उर्जा भवन, कमल बजाज शोरूम समोर भिगवन रोड, बारामती या ठिकाणी झाली होती.
हे ग्रामीण भागातील अग्निशामक व सुरक्षेविषयी कोर्सेस चालवणारे पहिले कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये १० वी पास, १२ वी पास/नापास, पदवीधर, ITI व इतर सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. फायर व सेफ्टी कोर्सनंतर विद्यार्थ्यांना सरकारी-निमसरकारी, औद्योगिक व खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच अग्निशामक प्रात्यक्षिकावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या बॅचमधील बऱ्याच विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, बारामती व अन्य ठिकाणी उत्तम पगाराची नोकरी मिळवून देण्यात कॉलेजने यश संपादन केलेले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात जाऊन कोर्स करण्यासाठी येणारा खर्च जास्त असल्याने तो कमी व्हावा या उद्देशाने संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता माफक फी मध्ये कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना संस्था व कॉलेज मार्फत नोकरीसाठी १००% सहकार्य केले जात आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश सेवा करण्याची संधीही मिळत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगारही उपलब्ध आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नवीन कोर्सकडे वळण्याची गरज आहे, असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य जी. एच. कुंभार सर व उपप्राचार्य एम. बी. राऊत सर यांनी केले आहे. संपर्क 9096697242/9545947577
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
