मंत्रिमंडळाच्या विस्तारात ” र ” अक्षरास चंद्रबळ आहे मात्र, देवेंद्रजी कोणाला गुरुबळ देणार ?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील आ. राम सातपुते, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राजाभाऊ राऊत यांच्यापैकी राज्यमंत्री पदाची संधी कोणाला मिळणार ??
सोलापूर ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात “र”अक्षरास चंद्रबळ आहे. मात्र भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोणाला गुरुबळ देणार ? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्यापैकी राज्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे व देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्याचा विचार होणार आहे. त्यामध्ये सोलापूर शहरातील सुभाषबापू देशमुख व विजयमालक देशमुख यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेही नाव जोरदार चर्चेत होते. मात्र, भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केलेली असल्याने आ. कल्याणशेट्टी यांचे नाव पाठीमागे पडलेले आहे. सोलापूर ग्रामीण मधील “र” अक्षराचे चंद्रबळ वाढलेले आहे. त्यामध्ये आ. राम सातपुते, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राजाभाऊ राऊत यांचा समावेश होत आहे. या तीन पैकी एका आमदारास राज्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे. चंद्रबळ जरी असले तरी गुरु बलाशिवाय शक्य होत नाही. तिन्ही आमदाराचे गुरु भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आहेत. त्यामुळे चंद्रावर असणाऱ्या कोणत्या आमदाराला देवेंद्रजी गुरुबळ देणार, यावर राज्यमंत्रीपद ठरणार आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद खात्रीशीर असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Good post and right to the point. I am not sure if this is actually the best place to ask but do you guys have any thoughts on where to hire some professional writers?
Thx 🙂 Escape room
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.