लावणी सम्राज्ञी प्रमिला सूर्यवंशी (लोदगेकर) यांना भारत सरकारचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार प्रदान

मुंबई (बारामती झटका)
दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय भवन जनपथ रोड दिल्ली येथे श्री. गजेंद्रसिंग शेखावत (सांस्कृतिक व पर्यटन मंत्री भारत सरकार), श्री. अरुणीश चावला (सचिव, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार), डॉ. संध्या पुरेचा (अध्यक्ष, संगीत कला अकॅडमी भारत सरकार), श्री. जोरावरसिंग जाधव (उपाध्यक्ष, संगीत कला अकॅडमी भारत सरकार) यांचे शुभहस्ते भारत सरकारच्या नाट्यसंगीत अकॅडमीचा सन 2022-23 चा “उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार” लावणी सम्राज्ञी प्रमिला सूर्यवंशी (लोदगेकर) यांना प्रदान करण्यात आला. तसेच या पुरस्काराबरोबर अन्य राज्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना भारत सरकारच्या वतीने एकूण 82 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रमिला यांनी अकलूज राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली. अकलूज लावणी स्पर्धेचा मानाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार याचबरोबर गोवा येथे भास्कर भूषण यांचा प्राईड ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लावणी कलावंत पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ही मानाचा पुरस्कार मिळाला. याचबरोबर अनेक पुरस्काराने प्रमिला लोदगेकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सरकारच्या वतीने चीन व दुबई येथे ‘महाराष्ट्राची लोककला’ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची पारंपारिक लावणी सादर करण्याचा मान मिळाला होता. आजही लावणी प्रशिक्षक व नवीन कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करीत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. प्रमिला लोदगेकर यांना पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचं विशेष कौतुक व अभिनंदन केलं आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.