मराठा सेवा संघ, अकलूज यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
वाघोली (बारामती झटका)
माळशिरस तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अकलूज नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकलूज येथील जयशंकर उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सामूहिकरित्या जिजाऊ वंदना गाऊन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्या प्रिया नागणे यांनी सादर केलेली शिवगर्जना कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अकलूज नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांच्यावतीने अकलूज येथील शिवसृष्टीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्याच ठिकाणी इतिहास तज्ञ व लेखक चंद्रशेखर गायकवाड यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्रपर व्याख्यान झाले. सदर व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी घडलेल्या घटना क्रमांची माहिती चंद्रशेखर गायकवाड यांनी उपस्थितांना दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांसमोर आपली व्याख्यानातून सांगितली.
सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, विभागीय सचिव वनिता कोरटकर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष निनाद पाटील, माळशिरस तालुका मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष हंबीरे साहेब, डॉ. कोडग, डॉ. सनस, माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे, प्रहार संघटनेचे अमोलजी जगदाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्या अक्काताई माने, प्रिया नागणे, तालुका जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, शुभांगी क्षीरसागर, संभाजी ब्रिगेडचे बबनराव शेंडगे तसेच अकलूज नगरपालिकेचे कर निरीक्षक प्रशासकीय अधिकारी श्री. नरोटे साहेब, कक्षा अधिकारी काशीद साहेब, बाळासाहेब वाईकर साहेब, अभियंता राहुल फुले, तेजस फुले, अक्षय फुले, नितीन काकडे, स्वप्निल कुलकर्णी तसेच अकलूज नगरपालिकेचे विभागातील कर्मचारी, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निनाद पाटील यांनी केले तर आभार संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng