मळोली गावात आर. के. हेअर स्टाईलचे उद्घाटन थाटात संपन्न झाले..
माळशिरस पंचायत समितीचे पक्षनेते रणजीतसिंह जाधव व सोलापूर जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती
मळोली (बारामती झटका )
मळोली ता. माळशिरस येथील नाभिक समाजाचे युवा नेते दत्तात्रय जगन्नाथ काशीद यांनी मळोली गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केस कर्तनालय दुकान सुरू केलेले होते. त्यांचा मुलगा ऋषिकेश यांच्या सर्व सुखसोयींनी युक्त असे, अद्यावत असणारे आर. के. हेअर स्टाईलचा उद्घाटन सोहळा दिमाखात व उत्साही वातावरणात संपन्न झाला.


आर. के. हेअर स्टाईलचे मालक मळोलीचे ऋषिकेश काशीद व दत्तात्रय काशीद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांत माळशिरस पंचायत समितीचे पक्षनेते रणजीतसिंह जाधव, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील, सुरेशदादा जाधव, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोषभैया राऊत, ग्राहक संरक्षण कक्षेचे जिल्हाप्रमुख महादेव बंडगर, शिवसेनेचे अकलूज शहर प्रमुख अनिलभाऊ बंदपट्टे, शिवसेनेचे वेळापूर प्रमुख रामकृष्ण जाधव, उपाध्यक्ष आप्पा कांबळे, शिवसेना युवा अध्यक्ष दत्ता साळुंखे, अमर खंडागळे, बबन परांडे, रजाक मुलाणी, कुरकुंभ येथील सिपला कंपनीचे एच. आर. गणेश जाधव, आरपीआयचे वेळापूर अध्यक्ष मिलिंद सरतापे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष राहुल सराटे, तानाजी जाधव, मिलिंद गायकवाड, कैकाडी संघटना अध्यक्ष अनिल भाऊ माने (कैकाडी), मळोली येथील डॉ दिनेशसिंह शिंदे, मळोली ग्रामपंचायतचे सदस्य भीमराव मोरे, पोपट काळे, दिलीप जाधव, संजय गुजर, शेंडेचिंच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदीप जाधव, नरवीर उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, बलभीम जाधव, श्रीधर जाधव, बापू जाधव, मतीन तांबोळी, वसंत काशीद, झलक मेन्स पार्लरचे नवनाथ जाधव, प्रशांत जाधव, सोमनाथ जाधव, विकास जाधव, नामदेव जाधव, राम जगताप, बाळाभाऊ जाधव, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.


सदरच्या दुकानात मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासाहेब जाधव पाटील, टेम्पो मालक प्रकाशराव जाधव, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
