महिला सक्षमीकरणासाठीचे प्रमोदिनी लांडगे यांचे कार्य कौतुकास्पद – आमदार बबनराव शिंदे
मानेगाव येथे महिलांचा स्नेह मेळावा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न
माढा (बारामती झटका)
आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे योगदान व उल्लेखनीय कार्य सुरू आहे. त्याप्रमाणेच मानेगाव येथील महिला बचत गटाच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी लांडगे यांचे विविध सामाजिक व राजकीय पदांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आमदार बबनराव शिंदे यांनी काढले आहेत.
ते मानेगाव ता. माढा येथे महिला स्वयंसहायता बचत गटाच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रास्ताविकात बचत गटाच्या संचालिका तथा आयोजक प्रमोदिनी लांडगे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांना सक्षम व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी 45 महिला बचत गटाच्या माध्यमातून माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. महिलांचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार बबनराव शिंदे व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, प्रत्येक कर्तृत्वावान पुरुषांच्या पाठीमागे जशी स्त्री खंबीरपणे उभी असते, तसेच प्रमोदिनी लांडगे यांच्या पाठीशी त्यांचे पती सुहास लांडगे उभे आहेत. प्रमोदिनी लांडगे यांना ज्या ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. त्यामुळे आज समाजाला अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची गरज असल्याचे सांगून बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित पदार्थ व वस्तूंना भविष्यात शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे म्हणाल्या की, प्रमोदिनी लांडगे यांची समाजातील तळागाळातील गोरगरीब लोक व महिलांसाठी काम करण्याची इच्छा व तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने चांगले काम करणाऱ्या महिलांना समाजाने स्वीकारून त्यांनी सहकार्य व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रमोदिनी लांडगे यांनी बचत गटाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक व राजकीय पदांच्या माध्यमातून महिलांची मोठी फळी उभी करून संघटन कौशल्याचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील, तालुका व्यवस्थापक अवधूत देशमुख, तालुका कृषी अधिकारी बी. डी. कदम, कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख, डॉ. विकास मस्के, मयूर काळे, हनुमंत बोराटे, विजय जाधव, ग्रामसेवक सुभाष गळगुंडे, मेजर गणेश लांडगे, शरद सातपुते, सुहास लांडगे, अविनाश शिंदे, हनुमंत भालेराव, शीतल देशमुख, रेखा पवार, देवशाला ताटे, भारती शिंदे, प्रतिभा नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सूत्रसंचालन मुख्याध्यापक अतुल देशमुख यांनी केले. तर आभार सुनयना क्षीरसागर यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng