Uncategorized
मांडवे येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती यांच्या वतीने मंगळवार दि. ३०/५/२०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर, मांडवे येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास स्कूल बॅग, जार किंवा टिफिन यापैकी कोणतीही एक वस्तू भेट देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng