माऊलींच्या माळशिरस तालुक्यातील पहिल्या गोल रिंगणात अश्व जे. एम. म्हात्रे कंपनीमुळे डौलाने घोडदौड करणार…
पुरंदावडे (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झालेले आहे. सदरची पालखी पुणे-सातारा जिल्ह्यातील पायी प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर माऊलींच्या पालखीतील पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते. सदरच्या रिंगण सोहळ्याची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. माऊलींच्या पहिल्या गोल रिंगणात अश्वाची घोडदौड जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमुळे डौलाने घोडदौड होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. माऊलींची सेवा म्हणून कंपनी पालखी महामार्गावरील अडथळे, मुक्कामाचे ठिकाण व रिंगण सोहळा मैदानाची डागडुजी व साफसफाई करण्याची अंतिम तयारी होत आलेली आहे. नॅशनल हायवे जॉनी शर्मा, विश्वजीत काकडे साहेब, कवलकर साहेब, जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे जनरल मॅनेजर व्यवस्थापक दीपकसिंह पाटणकर, प्रोजेक्ट मॅनेजर विनोद वल्लाल, असिस्टंट जनरल मॅनेजर सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे रिंगण सोहळ्याचे मैदान साफसफाई करण्याचे काम सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng