माढा लोकसभा २०२४ साठी काँग्रेस पक्ष प्रबळ दावेदार पक्ष – हुसेन दलवाई
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
माढा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा मतदार संघ होता आणि २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असून माढा लोकसभेसाठी काँग्रेसचाच उमेदवार असेल, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक व काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी ४३ माढा लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघाची आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माढा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक मोहन जोशी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना हुसेन दलवाई म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील संघटनात्मक बांधणी मजबूत झाली आहे. शिवाय काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अनुभवी नेतृत्व पाठीशी आहे. त्यामुळे बहुतांश आमदार काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसत आहे. तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून त्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळाली आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे धडाडीचे नेतृत्व मिळाल्याने युवक वर्ग काँग्रेसकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाला आहे. त्यामुळे पक्षाला अधिकच बळकटी मिळाली आहे. तसेच खासदार राहुल गांधी यांच्या “भारत जोडो” या पदयात्रेमुळे काँग्रेस पक्षाला देशात मतदार परत संधी देणार आहेत. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यासारखे प्रबळ नेतृत्व मिळाले असून आगामी २०२४ च्या लोकसभेनंतर राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने गल्ली ते दिल्ली कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
याप्रसंगी बोलताना काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, लोकशाहीत मतदार हा राजा असून त्याला महत्त्वाचे स्थान आहे. आणि २०२४ मध्ये देशात निश्चितच परिवर्तन होणार असून माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच, हे सत्य आहे. आगामी काळात इतर पक्षातील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आमदारांची संख्या वाढणार आहे. भाजप सरकारच्या या काळातील वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी शिवाय महिलांवरील अत्याचाराचा यांचा तर कहरच झाला असून त्यामुळे मतदार आता २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. येणाऱ्या काही दिवसात काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात पदयात्रा काढून जनजागृती करणार आहे. तसेच देशात अधिकाधिक खासदार निवडून आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे ध्येय प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे येणारा काळ काँग्रेसला चांगला असल्याचे सांगितले.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील असतील काय ?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, उमेदवारीबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील, तो अधिकार आम्हाला नाही असेही ते म्हणाले.
या आढावा बैठकीस प्रदेश काँग्रेस, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, तालुका ब्लॉक, शहराध्यक्ष, पदाधिकारी, फ्रंटल सेल विभागाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, माजी सभापती, सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषदेचे, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद गटप्रमुख, पंचायत समिती गण प्रमुख, बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालघर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रफिक भोरी, जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सूनंजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, आण्णासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष सतीशनाना पालकर, शहर अध्यक्ष नवनाथ साठे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The author’s analysis was spot-on and thought-provoking. I’m looking forward to hearing what others think. Feel free to visit my profile for more discussions.
Salut, ech wollt Äre Präis wëssen.